सलीम खान यांची प्रकृती आता कशी? लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:50 IST2026-03-10T12:50:00+5:302026-03-10T12:50:30+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात सलीम खान उपचार घेत आहेत.

Salim Khan Health Update Discharge From Lilavati Hospital Brain Hemorrhage Recovery | सलीम खान यांची प्रकृती आता कशी? लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

सलीम खान यांची प्रकृती आता कशी? लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

बॉलिवूडचे दिग्गज पटकथा लेखक आणि सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान (८८) यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत सकारात्मक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सलीम खान यांना येत्या ३ ते ४ दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

पत्रकार विकी लालवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सलीम खान यांना सौम्य 'ब्रेन हॅमरेज' (मेंदूत रक्तस्त्राव) झाल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले आणि अखेर त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा झाली आहे.

आमिर खानसह अनेक स्टार्सनी घेतली भेट
सलीम खान आजारी असल्याचे समजताच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी रुग्णालयात धाव घेतली. सुपरस्टार आमिर खानने स्वतः रुग्णालयात जाऊन खान कुटुंबाची भेट घेतली. आमिर म्हणाला, "मी सलीम साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. ते आयसीयूमध्ये असल्याने माझी भेट होऊ शकली नाही, पण आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत". आमिरशिवाय डेझी शाह आणि इंडस्ट्रीतील इतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

खान कुटुंबासाठी कठीण काळ
सलीम खान यांची दोन्ही मुलं सलमान, अरबाज, सोहेल आणि दोन्ही पत्नी सलमा व हेलन या कठीण काळात सातत्याने त्यांच्यासोबत आहेत. ८८ व्या वर्षी सलीम खान यांनी दिलेली ही झुंज कौतुकास्पद असून, ते घरी परतणार असल्याच्या वृत्ताने चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Web Title : सलीम खान का स्वास्थ्य अपडेट: डॉक्टर आशावादी, जल्द छुट्टी संभव।

Web Summary : दिग्गज लेखक सलीम खान, हल्के ब्रेन हेमरेज के कारण लीलावती अस्पताल में भर्ती, तेजी से ठीक हो रहे हैं। डॉक्टरों को 3-4 दिनों में छुट्टी मिलने की उम्मीद है। आमिर खान जैसे सितारे मिलने आए। परिवार इस मुश्किल समय में साथ है।

Web Title : Salim Khan's Health Update: Doctors optimistic, discharge likely soon.

Web Summary : Veteran writer Salim Khan, admitted to Lilavati Hospital for a mild brain hemorrhage, is showing remarkable recovery. Doctors anticipate discharging him in 3-4 days. Stars like Aamir Khan visited. The family remains supportive during this challenging time.