"मला जबरदस्ती खांद्यावर kiss...", साक्षी गुप्ताच्या आरोपामुळे खळबळ; नेटफ्लिक्सच्या शोमध्ये हंगामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:52 IST2023-04-10T12:50:38+5:302023-04-10T12:52:08+5:30

शोमधील स्पर्धक साक्षी गुप्ताने सहस्पर्धकावर गंभीर आरोप केला आहे.

sakshi gupta accuses virendra co contestant in netflix show in real love virendra kissed her without permission | "मला जबरदस्ती खांद्यावर kiss...", साक्षी गुप्ताच्या आरोपामुळे खळबळ; नेटफ्लिक्सच्या शोमध्ये हंगामा

"मला जबरदस्ती खांद्यावर kiss...", साक्षी गुप्ताच्या आरोपामुळे खळबळ; नेटफ्लिक्सच्या शोमध्ये हंगामा

नेटफ्लिक्सच्या एका पॉप्युलर रिअॅलिटी शोमध्ये छेडछाडीचे प्रकरण समोर आले आहे. 'इन रिअल लव्ह' या डेटिंग शोमध्ये ही घटना घडली आहे. रणविजय सिंह (Ranvijay Singh) आणि गौहर खान (Gauhar Khan) या शोचे होस्ट आहेत. शोमधील स्पर्धक साक्षी गुप्ताने सहस्पर्धकावर गंभीर आरोप केला आहे. कोस्टारने तिला परवानगी न घेता kiss केल्याचं हे प्रकरण आहे. त्यामुळे सध्या हा शो चांगलाच चर्चेत आलाय.

'इन रियल लाईफ' च्या चौथ्या एपिसोडमध्ये हंगामा झाला. एका स्पर्धकाने गैरवर्तवणूक केल्याचा आरोप साक्षी गुप्ताने लावल्याने एकच खळबळ माजली. साक्षी म्हणाली, 'वीरेंद्रने माझ्यासोबत अशी वर्तवणूक केली. जबरदस्ती माझ्या खांद्यावर kiss केले. तर आता यावर वीरेंद्रचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

साक्षी आणि वीरेंद्रची पूल पार्टी

शोमध्ये साक्षी आणि वीरेंद्र या दोन स्पर्धकांना एकमेकांसोबत वेळ घालवण्यास सांगण्यात आले होते. जर दोघांच्यात पटलं तर नातं पुढे नेण्याची योजना होती. म्हणून दोघांसाठी पूल पार्टीचे आयोजन केले गेले. यावेळी दोघांमध्ये गप्पा झाल्या, दारु प्यायली आणि मग हा हंगामा झाला.

साक्षी म्हणाली,'वीरेंद्रने माझ्या खांद्यावर मला न विचारता kiss केले. जे मला अजिबातच आवडले नाही. पण मी तेव्हा नशेत होते त्यामुळे मला नीट आठवत नाही. मात्र मी वीरेंद्रच्या अशा वागण्यामुळे खूप सरप्राईज झाले आहे.' यामुळे आता दोघांमधलं नातंही तुटलं आहे.

वीरेंद्रची प्रतिक्रिया 

या सर्व आरोपांवर वीरेंद्र म्हणाला,'तुम्ही किती जरी नशेत असलात तरी तेव्हा तुमचे मूडस्विंग होत नाहीत. तेव्हा तुम्ही एका खास मूडमध्ये असता. तुमचे हावभाव काहीतरी सांगू पाहतात. स्वत: काहीतरी करायचं आणि नंतर म्हणायचं आता मी शुद्धीत आलो आहे. मला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. 

Web Title: sakshi gupta accuses virendra co contestant in netflix show in real love virendra kissed her without permission