Sajid Khan Dating: साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 06:28 PM2023-02-20T18:28:30+5:302023-02-20T18:29:20+5:30

Sajid Khan Dating, Bigg Boss 16: बिग बॉस 16 हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धकांची चर्चा मात्र अद्यापही सुरू आहे. होय, अनेक स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत.

sajid khan dating bigg boss 16 contestant soundarya sharma | Sajid Khan Dating: साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात

Sajid Khan Dating: साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चा जोरात

googlenewsNext

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धकांची चर्चा मात्र अद्यापही सुरू आहे. होय, अनेक स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. काहींना बिग बाॅसच्या घराबाहेर पडताच मोठ मोठ्या ऑफर्स मिळाल्या आहेत, काही सेलिब्रेशनमध्ये बिझी आहेत अन् दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या आहेत. होय, साजिद खान (Sajid Khan) बिग बॉस 16 मधील एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा जोरात आहे. आता ही अभिनेत्री कोण तर सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma). होय, बिग बॉसच्या घरात गौतम विगच्या प्रेमात पडलेली सौंदर्या आता साजिदच्या प्रेमात असल्याची कुजबूज सुरू झालीये. साजिद खान आणि सौंदर्या यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

साजिदने सौंदर्याला त्याच्या चित्रपटात एक आयटम साँग दिलं असल्याची बातमी मध्यंतरी आली होती. मीटूच्या आरोपामुळे गेल्या चार वर्षांपासून साजिद खान बॉलिवूडमधून गायब होता. अशात बिग बॉसच्या घरात त्याची एन्ट्री झाली. बिग बॉसनंतर आता साजिदने दिग्दर्शनात कमबॅक करण्याची तयारी चालवली आहे. लवकरच तो एक नवीन चित्रपट घेऊन येत असल्याची माहिती आहे. या सिनेमात शहनाज गिल मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचंही कळतंय. याच चित्रपटात साजिदने म्हणे सौंदर्या एक आयटम सॉंग करण्याची संधी दिली आहे. साजिद व सौंदर्या एकमेकांना डेट करत असून त्यामुळे तो तिच्यावर मेहरबान झाल्याचीही चर्चा आहे. या बातम्यात किती तथ्य आहे, हे ठाऊक नाही. पण चर्चा जोरात आहे, हे नक्की. 

बिग बॉसच्या घरात असताना सौंदर्या गौतमशी रोमान्स करताना दिसली होती. पण शोमध्ये दाेघांचं ब्रेकअप झालं होतं. आता बिग बॉस संपताच सौंदर्या साजिदला डेटींगच्या बातम्या आहेत.  अलीकडेच अब्दु रोजिकच्या पार्टीत सौंदर्या मंडली सोबत खूप फ्रेंडली वागताना दिसली. साजिद खान कधीकाळी जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये होता. साजिद व गौहर खानच्या अफेअरच्याही चर्चाही कधीकाळी बी टाऊनमध्ये रंगल्या होत्या.

Web Title: sajid khan dating bigg boss 16 contestant soundarya sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.