"सिनेमात काम मिळावं म्हणून मी रिल्स बनवले"; 'सैयारा' स्टार अहान पांडेचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 11:56 IST2025-08-30T11:53:13+5:302025-08-30T11:56:15+5:30

'सैयारा' सिनेमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता अहान पांडेने सोशल मीडियावर सिनेमात काम मिळावं म्हणून काय केलं, याचा खुलासा केलाय

saiyaara movie actor ahaan pande talk about made reels to get work in movies | "सिनेमात काम मिळावं म्हणून मी रिल्स बनवले"; 'सैयारा' स्टार अहान पांडेचा मोठा खुलासा

"सिनेमात काम मिळावं म्हणून मी रिल्स बनवले"; 'सैयारा' स्टार अहान पांडेचा मोठा खुलासा

'सैयारा' सिनेमामुळे अभिनेता अहान पांडेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. अहान 'सैयारा' सिनेमाआधी सोशल मीडियावर रिल्स व्हिडीओमुळे चर्चेत होता. अहानने हे रिल्स  व्हिडीओ  बनवण्यामागचं एक खास कारण सांगितलं. अहानने सांगितलं की, चित्रपटसृष्टीत काम मिळावे, यासाठीच त्याने इंस्टाग्रामवर अनेक रिल्स व्हिडिओ बनवले. काय म्हणाला अहान, जाणून घ्या.

काम मिळवण्यासाठी वेगळा ‘लूक’

अहान पांडेने एका मुलाखतीत सांगितले की, ''मी इंस्टाग्रामवर जे व्हिडिओ बनवले, तो मी खरा नाही. तर मी काम मिळवण्यासाठी तयार केलेला एक वेगळा चेहरा होता.  त्याने हे मान्य केले की, चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने वागावे लागते.'' अहानने म्हटले की, ''माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, काम मिळवण्यासाठी तू एका विशिष्ट पद्धतीने वागले पाहिजे. मला हे दुःख आहे की मी तसे वागलो, कारण मी खरा असा नाही.''

वास्तविक जीवन खूप वेगळे

अहान पांडेने सांगितले की, ''वास्तविक जीवनात मी खूप वेगळा आहे. माझे मित्र, कुटुंब आणि जवळचे लोक मला चांगले ओळखतात. मी सोशल मीडियावर जे दाखवतो, त्यापेक्षा मी खूप शांत आणि साधा आहे.'' अहान पांडेने शेवटी हे स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील त्याचा उद्देश केवळ काम मिळवण्याचा एक प्रयत्न होता. तो लवकरच ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली यांच्यासोबत काम करणार आहे. अशाप्रकारे स्टार किड्सला सुद्धा काम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, हेच यावरुन समजतं. अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा 'सैयारा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

Web Title: saiyaara movie actor ahaan pande talk about made reels to get work in movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.