'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:15 IST2025-10-06T12:15:02+5:302025-10-06T12:15:33+5:30
कोण आहे अनीत पड्डाची आवडती अभिनेत्री?

'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
'सैयारा' या सिनेमाने काही महिन्यांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मोहित सुरी दिग्दर्शित या सिनेमातून अहान पांडे आणि अनीत पड्डा हे दोन्ही तरुण कलाकार सिनेसृष्टीला मिळाले. या सिनेमामुळे दोघंही रातोरात स्टार बनले. अनीत पड्डाने नुकतंच एका मुलाखतीत तिच्यासाठी आदर्श अभिनेत्री कोण याचा खुलासा केला. तसंच सिनेमाच्या रिलीजनंतर त्या अभिनेत्रीसोबत अनीत फोनवर १० मिनिटे बोललीही होती. कोण आहे ती अभिनेत्री?
नुकतंच कॉस्मोपॉलिटन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनीत पड्डाने 'सैयारा'च्या काही गोष्टी शेअर केल्या. तेव्हा तिने आलिया भटला आदर्श मानत असल्याचं सांगितलं. तसंच फॅनगर्लचा किस्साही शेअर केला. आलियाने आधीच सिनेमा पाहून सोशल मीडियावर व्यक्त झाली होती. तिने सिनेमा आणि कलाकारांचा अभिनय सगळ्याचीच स्तुती केली होत. तेव्हा आलियाने अनीतशी फोनवर जवळपास १० मिनीटं सिनेमाविषयी चर्चाही केली होती. अनीत पड्डा म्हणाली,"मी लहान होते तेव्हा आरशासमोर उभं राहून स्वत:शीच बोलायचे. मी आलिया भटच्या सर्व मोनोलॉगचा अभ्यास करायचे. मनात विचार यायचा की, 'हे मी कसं करु शकते? आणि नंतर 'हे मी माझ्या पद्धतीने कसं करु शकते?' असं वाटायचं.
'सैयारा'पाहून आलियाने लिहिले होते, 'हे बोलणं योग्य असेल..दोन सुंदर, जादुई तारे जन्माला आले आहेत. अहान आणि अनीत...मी दोन कलाकारांना इतकं प्रेमाने शेवटचं कधी पाहिलं असेल मला आठवत नाही. माझ्या डोळ्यात तारे चमकत आहेत. तुमच्या डोळ्यात तोच स्पार्क आहे. तुम्ही दोघंही इतक्या व्यक्तित्व आणि प्रामाणिकपणे चमकत आहात की मी तुम्हाला असं सतत पाहत राहू शकते. खरं सांगायचं तर मी खरोखर पाहत राहणार आहे. आधीच मी वैयक्तिकरित्या तुमच्याशी बोलून प्रेम व्यक्त केलं आहे. पण तेवढंच पुरेसं नव्हतं म्हणून इथेही सांगत आहे. पुन्हा एकदा खूप प्रेम."