बाळामध्ये नकोय करिनाला सैफची ‘ही’ सवय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 19:43 IST2016-11-16T19:43:44+5:302016-11-16T19:43:44+5:30
लवकरच करिना कपूर व सैफ अली खान यांच्या बाळाचा जन्म होणार आहे. अर्थातच दोघेही यासाठी उत्सुक आहेत. मात्र करिनाला ...

बाळामध्ये नकोय करिनाला सैफची ‘ही’ सवय
करिना कपूर हिने नुकतीच नेहा धुपिया हिचा शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या होणाºया बाळाबद्दल भरभरून गप्पा केल्या. सैफची कोणती सवय तुझ्या बाळामध्ये येऊ नये असे वाटते? असा प्रश्न नेहाने विचारला. यावर करिना म्हणाली की, सैफला वाईट सवयी नाहीत. पण त्याच्या एका सवयीमुळे मला नेहमी त्रास होतो. सैफला झोप खूप प्रिय आहे. तो १८ तास झोपू शकतो. अगदी कुंभकर्णाप्रमाणे. मला वाटते एवढी झोप घेणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे, तर सैफ उशिरापर्यंत झोपलेला असतो. याचा मला कधीकधी फार त्रास होतो. नेमकी हीच सवय आमच्या होणाºया बाळात असू नये असे मला आता वाटू लागलेय.
करिना डिसेंबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. करिनाने स्वत:बद्दल सांगितले, मी लढाऊ बाण्याची आहे. बहुतेक कन्या राशीचे सर्व लोक असेच असतात. मी लहान गोष्टींची तेवढीच काळजी करते जेवढ्या मोठ्या गोष्टींची करायला हवी. मला माझी सवयही कधी-कधी त्रासदायक ठरते.
बाळाचे नाव काय असेल असे विचारल्यावर ती म्हणाली, सैफ व मला मीडियाने ‘सैफिना’ नाव दिले आहे. सैफला हे नाव फार आवडले तो म्हणतोय हेच आपल्या बाळाचा नाव असावे. मात्र त्याला इतिहासात स्वारस्य असल्याने त्याचे नाव राजेशाही थाटाचे असू शकते.