सैफ-अमृताच्या घटस्फोटावर सारा अली खानचे आहे हे म्हणणे, वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 15:31 IST2021-04-05T15:30:50+5:302021-04-05T15:31:15+5:30

सैफ अली खान आणि अमृता सिंग लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघे विभक्त झाले होते.

Saif: Saying that Sara Ali Khan is on Amrita's divorce, you will be surprised to read | सैफ-अमृताच्या घटस्फोटावर सारा अली खानचे आहे हे म्हणणे, वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

सैफ-अमृताच्या घटस्फोटावर सारा अली खानचे आहे हे म्हणणे, वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

अभिनेता सैफ अली खान असा अभिनेता आहे जो आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. सैफचे पहिले लग्नाची कथा खूप इंटरेस्टिंग आहे. त्याने स्वतःपेक्षा वयाने १२ वर्षे मोठी अमृता सिंगसोबत कुटुंबाला न सांगता लग्न केले होते. लग्नाच्या वेळी तो फक्त २० वर्षांचा होता. हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि दोघे लग्नाला १३ वर्षे झाल्यानंतर विभक्त झाले.


सैफ अली खान आणि अमृता सिंगला दोन मुले आहेत ते म्हणजे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. सारा आता बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे. एका मुलाखतीत जेव्हा सारा अली खानला विचारण्यात आले होते की तू तुझ्या आईला विचारले होतेस का की त्यांनी सैफसोबत लग्न का केले होते?. त्यावर सारा म्हणाली होती की, हो मी त्यांना विचारले होते आणि म्हटले होते जेव्हा तुम्ही २६ वर्षांच्या होत्या तेव्हा सैफ वयाने खूप लहान होते मग तुम्ही त्यांच्याशी लग्न कसे केले. मग मी विचार केला की जर त्यांच्यात प्रेम नसते तर मी कशी जन्माला आले असते. 


सारा पुढे म्हणाली होती की, असे घर काय कामाचे जिथे लोक आनंदी नाहीत. माझे पालक वेगवेगळे व्यक्ती असून त्यांची वेगळी व्यक्तिमत्त्व आहेत. दोघे एकत्र राहून कधी आनंदी राहू शकत नव्हते आणि ही गोष्ट त्यांना कळून चुकली होती. त्यामुळे ते वेगळे झाले त्यात काहीच चुकीचे नाही. 


अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खानने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. या लग्नाला सारादेखील उपस्थित होती. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी साराची आई अमृता सिंगनेच तिला तयार केले होते.

Web Title: Saif: Saying that Sara Ali Khan is on Amrita's divorce, you will be surprised to read