सैफ अली खानच्या ‘कालाकांडी’ चित्रपटाच्या रिलीज डेटची केली घोषणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2017 17:02 IST2017-06-24T11:32:22+5:302017-06-24T17:02:22+5:30
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचा आगामी ‘कालाकांडी’ हा चित्रपट दि. ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार असल्याचे स्पष्ट झाले ...
.jpg)
सैफ अली खानच्या ‘कालाकांडी’ चित्रपटाच्या रिलीज डेटची केली घोषणा !
ब लिवूड अभिनेता सैफ अली खान याचा आगामी ‘कालाकांडी’ हा चित्रपट दि. ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी सैफने म्हटले की, हा एक मजेशीर चित्रपट असेल. एका वक्तव्यानुसार, चित्रपटाच्या रिलीजची घोषणा सिनेस्तान फिल्म कंपनीमार्फत करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय वर्मा यांनी केले असून, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी ‘देल्ही बेली’ या चित्रपटात पटकथा लेखक म्हणून काम केले आहे. सैफने म्हटले की, ‘कालाकांडी’चा एक भाग बनल्याचा मला आनंद होत आहे. मुंबईच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट प्रेम आणि गुन्हेगारीवर आधारित आहे.
सूत्रानुसार, चित्रपटाची पटकथा सैफला समोर ठेवूनच लिहण्यात आली आहे. त्यामुळेच पटकथा लिहिण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागले आहेत. याविषयी सैफने म्हटले की, अक्षतने या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना पटकथादेखील लिहिली आहे. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट खूपच उत्कृष्टपणे बनविला आहे. मुंबई खूपच चांगले शहर असून, चित्रपटात ते उत्कृष्टपणे दाखविण्यात आले असल्याचेही सैफने सांगितले.
![]()
दरम्यान, ‘कालाकांडी’मध्ये दीपक डोबरियाल, विजय रज, कुणाल रॉय कपूर, सोबिता धुलिपला, अक्षय ओबेरॉय, ईशा तलवार, शेनाज ट्रेजुरिवाला, शिवम पाटील, अमायरा दस्तूर आणि नील भूपलम यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी सैफचे ‘शेफ, कालाकांडी आणि बाजार’ हे तीन चित्रपट रिलीज होण्यास तयार आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खान विपुल शाहच्या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे.
दरम्यान, सैफ सध्या त्याची मोठी मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूवरूनही चर्चेत आहे. सारा सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार आहे. अभिषेकने ‘काय पो छे’ आणि ‘फितूर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.