सैफ अली खान 'आदिपुरुष' चं प्रमोशन करणार नाही, काय आहे नेमकं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:43 IST2023-04-27T12:41:00+5:302023-04-27T12:43:16+5:30

16 जून रोजी 'आदिपुरुष' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Saif Ali Khan will not promote Adipurush because he will be going for holidays with family | सैफ अली खान 'आदिपुरुष' चं प्रमोशन करणार नाही, काय आहे नेमकं कारण?

सैफ अली खान 'आदिपुरुष' चं प्रमोशन करणार नाही, काय आहे नेमकं कारण?

ओम राऊत दिग्दर्शित आगामी 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा प्रदर्शनाच्या आधीच चर्चेत आहे. यामध्ये प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत तर देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan) दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक आल्यावर तो फारसा काही चाहत्यांच्या पसंतीस पडला नाही. व्हीएफएक्स, कलाकारांचा लुक चाहत्यांना रुचलं नाही आणि सिनेमाला ट्रोल केले गेले. आता मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही. नेमकं काय आहे कारण जाणून घेऊया.

16 जून रोजी 'आदिपुरुष' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही दिवसांनी कलाकार प्रमोशन सुरु करतील. दरम्यान रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान मात्र प्रमोशनवेळी गैरहजर असणार आहे. याचं कारण म्हणजे सैफ कुटुंबासोबत हॉलिडेला जाणार आहे. त्यामुळे प्रमोशनची धुरा प्रभास आणि क्रिती सेननवरच असणार आहे. 

'आदिपुरुष' चा फर्स्ट लुक आणि टीझर लॉंच झाल्यानंतर जोरदार विरोध करण्यात आला. यामध्ये सैफ अली खानच्या दाढीमुळे त्याचा लुक मुघलांसारखा दिसत असल्याने सिनेमावर जोरदार टीका झाली. तसंच यातील VFX ही कोणाला आवडलं नाही. एकंदर विरोध बघता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा सिनेमा तब्बल ५ महिने पुढे ढकलला. 

Web Title: Saif Ali Khan will not promote Adipurush because he will be going for holidays with family