​करिना कपूर नव्हे तर या अभिनेत्रीची सैफ अली खानने निवड केली होती सेक्सिएस्ट वुमन म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 13:06 IST2018-06-01T07:36:15+5:302018-06-01T13:06:15+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाला आता कित्येक वर्षं झाले असून त्यांना एक मुलगा देखील आहे. सध्या ...

Saif Ali Khan, who was chosen by actress Kareena Kapoor as Sexiest Woman ... | ​करिना कपूर नव्हे तर या अभिनेत्रीची सैफ अली खानने निवड केली होती सेक्सिएस्ट वुमन म्हणून...

​करिना कपूर नव्हे तर या अभिनेत्रीची सैफ अली खानने निवड केली होती सेक्सिएस्ट वुमन म्हणून...

फ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाला आता कित्येक वर्षं झाले असून त्यांना एक मुलगा देखील आहे. सध्या सैफ आणि करिनापेक्षा त्यांचा मुलगा तैमुरची चर्चा सोशल मीडियावर अधिक होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सैफ अली खानचे करिनासोबत लग्न होण्यापूर्वी त्याचे अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न झाले होते तर करिना अनेक वर्षं शाहिद कपूर सोबत नात्यात होती. पण रोजा या इटालियन अभिनेत्रीसाठी सैफने पत्नीला घटस्फोट दिला. रोजा आणि सैफ लग्न करणार असे सगळ्यांना वाटत असताना त्यांच्यात बिनसले तर दुसरीकडे जब वी मेट हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी करिना आणि शाहिदचे ब्रेकअप झाले. सैफचे रोजासोबत नाते संपुष्टात आले होते तर दुसरीकडे करिना देखील सिंगल होती. त्याचवेळी कुरबान या चित्रपटाच्या सेटवर सैफ आणि करिना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  
करिना आणि सैफ हे आज बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. ते दोघे अनेक पार्टींमध्ये, समारंभात एकत्र हजेरी लावतात. करिना ही आज बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री मानली जाते. बॉलिवूडनधील सेक्सिएस्ट वुमनमध्ये तिची गणना केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, काही वर्षांपूर्वी सैफ अली खानने एका मुलाखतीत करिना कपूरची नव्हे तर एका दुसऱ्याच अभिनेत्रीची सेक्सिएस्ट वुमन म्हणून निवड केली होती.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात अनेक वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांनी हजेरी लावली होती. ते दोघे एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. या कार्यक्रमात त्या दोघांनी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर सोबत खूप धमाल मस्ती केली होती. या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये सैफला काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते. या प्रश्नांमध्ये बॉलिवूडमधील सध्याची सेक्सिएस्ट वुमन कोण आहे... करिना कपूर की प्रीती झिंटा असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने करिनाची निवड न करता प्रीतीची निवड केली होती. 

Also Read : सोनम कपूरच्या लग्नात स्टायलिश अंदाजात अवतरला छोटा नवाब

Web Title: Saif Ali Khan, who was chosen by actress Kareena Kapoor as Sexiest Woman ...