इब्राहिमच्या फिल्म करिअरबाबत सैफने केला खुलासा, म्हणाला - तो आता तयार आहे...

By अमित इंगोले | Updated: November 5, 2020 12:45 IST2020-11-05T12:38:32+5:302020-11-05T12:45:28+5:30

सैफ अली खान आधीच म्हणाला होता की, त्याची इच्छा होती की, इब्राहिमने आधी त्याचं युनिव्हर्सिटीतील शिक्षण पूर्ण करावं.

Saif Ali Khan wants to see Ibrahim Ali Khan in film industry | इब्राहिमच्या फिल्म करिअरबाबत सैफने केला खुलासा, म्हणाला - तो आता तयार आहे...

इब्राहिमच्या फिल्म करिअरबाबत सैफने केला खुलासा, म्हणाला - तो आता तयार आहे...

सैफ अली खानला त्याच्या संपूर्ण परिवाराला बॉलिवूडमध्ये बघायचं आहे. सैफची आई शर्मिला टागोर या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. नंतर सैफ स्वत:, त्याची बहीण सोहा, जावई कुणाल खेमू, दोन्ही पत्नी अमृता सिंह आणि करिना कपूर, मुलगी सारा आधीच बॉलिवूडमध्ये आहेत. आता सैफची इच्छा आहे की, त्याच्या इतर मुलांनीही बॉलिवूडमध्ये पाय रोवावे.

सैफ अली खान आधीच म्हणाला होता की, त्याची इच्छा होती की, इब्राहिमने आधी त्याचं युनिव्हर्सिटीतील शिक्षण पूर्ण करावं. आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये आपलं करिअर करावं. सैफला असंही वाटतं की, आता इब्राहिम अली खान सिनेमात येण्यासाठी तयार आहे. 

'स्पॉटबॉट'सोबत बोलताना सैफ म्हणाला की, फिल्म इंडस्ट्री काम करण्यासाठी एक चांगली जागा आहे. तो म्हणाला की, जेव्हा तो १७-१८ वर्षांचा होता तेव्हा त्याला काहीच येत नव्हतं आणि अॅक्टिंगने त्याचं जीवन सावरलं होतं. 

मुलांना बॉलिवूडमध्ये बघायचंय

सैफ म्हणाला की, त्याची इच्छा आहे त्याच्या प्रत्येक मुलाने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवावं. मुलगी सारा अली खान आधीच बॉलिवूडमध्ये काम करत आहेत आणि तिचे 'केदारनाथ', 'सिंबा' आणि 'लव्ह आज काल' हे तीन सिनेमे आले आहेत. लहान मुलगा तैमूर सोशल मीडियावर चांगलाच पॉप्युलर आहे.

इब्राहिमला लॉन्च करणार सैफ?

इंब्राहिमच्या लॉन्चिंगवर सैफ म्हणाला की, त्याला वाटतं की, इब्राहिम आता अॅक्टिंगसाठी तयार आहे. पण त्याने याबाबत काहीच सांगितलं नाही की, त्याला बॉलिवूड तो स्वत: लॉन्च करेल की नाही. सैफने हे नक्की सांगितलं की, इब्राहिम अॅक्टिंग करण्यात इंट्रेस्टेड आहे.

इब्राहिमसाठी सैफचा सल्ला

सैफ अली खानचं म्हणणं आहे की, त्याला इब्राहिमला हाच सल्ला द्यायचा आहे की, त्याने मेहनत करावी आणि योग्य सिनेमांची निवड करावी. सैफ म्हणाला की, जग फार बदललं आहे आणि स्वत:ला सिद्ध करणं, आपली जागा निर्माण करणं आधीपेक्षा खूप कठिण झालं आहे.
 

Web Title: Saif Ali Khan wants to see Ibrahim Ali Khan in film industry