सैफ का लाडला बिगड़ गया...! इब्राहिम अली खान या विदेशी बालेच्या प्रेमात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 14:05 IST2020-03-22T14:02:05+5:302020-03-22T14:05:33+5:30

इब्राहिमने हा फोटो शेअर केला आणि गॉसिप्स जगतात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. 

saif ali khan son ibrahim ali khan post with a mystery girl-ram | सैफ का लाडला बिगड़ गया...! इब्राहिम अली खान या विदेशी बालेच्या प्रेमात!!

सैफ का लाडला बिगड़ गया...! इब्राहिम अली खान या विदेशी बालेच्या प्रेमात!!

ठळक मुद्दे 19 वर्षाचा इब्राहिम येत्या काळात बॉलिवूड डेब्यू करू शकतो.  

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खान हिने बॉलिवूड डेब्यू केला आणि आज ती बॉलिवूडची स्टार म्हणून ओळखली जातेय. सारापाठोपाठ आता तिचा भाऊ इब्राहिम अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असे मानले जात आहे. पण इब्राहिम सध्या शिकतोय. असे असले तरी इब्राहिम सतत चर्चेत असतो. सध्या तो एका फोटोमुळे चर्चेत आलाय. इब्राहिमने हा फोटो शेअर केला आणि गॉसिप्स जगतात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. होय, पतौडी घराण्याचा वारस इब्राहिम या फोटोत एका मिस्ट्री गर्लसोबत दिसतोय. 

या फोटोत त्याच्यासोबत एक मुलगी आहे. तिचे नाव लॉटी स्टीवेन्स. दोघेही एका फिश टँकसमोर पोज देत आहेत. फोटोत इब्राहिमने नेव्ही ब्ल्यू कलरचा टी-शर्ट व जीन्स घातली आहे तर लॉटीने सिंपल व्हाईट क्रॉप टॉप कॅरी केला आहे. 

या फोटोला इब्राहिमने दिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. होय, ‘आय मिस यू’असे कॅप्शन इब्राहिमने या फोटोला दिले आहे. सोबत फोटोवर एक स्टिकरही आहे. यावर ‘होमसिक’ असे लिहिलेले दिसतेय.


फोटो बघता लॉटी इब्राहिमसाठी अतिशय स्पेशल असल्याचे मानले जात आहे. तेव्हाच तो तिला मिस करतोय. लॉटीने हाच फोटो 9 मार्चला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. याआधीही लॉटीने इब्राहिमसोबतचा फोटो पोस्ट केला होता. त्यात दोघेही पार्टी करताना दिसले होते.

Web Title: saif ali khan son ibrahim ali khan post with a mystery girl-ram