१००० रुपये देते, मला १० वेळा किस कर...; सैफकडे महिला प्रोड्युसरने केलेली विचित्र मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:53 IST2025-09-27T13:04:48+5:302025-09-27T13:53:22+5:30
सैफने सांगितलं की प्रोड्युसरने त्याला १ हजारच्या बदल्यात किस करण्याची ऑफर दिली होती.

१००० रुपये देते, मला १० वेळा किस कर...; सैफकडे महिला प्रोड्युसरने केलेली विचित्र मागणी
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान लोकप्रिय अभिनेता आहे. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. आई सुप्रसिद्ध अभिनेत्री असुनही सैफला बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला. बॉलिवूडमध्ये त्याला अनेक विचित्र अनुभवही आले. नवाब घराण्यातील असूनही महिला प्रोड्युसरने सैफकडे अजब मागणी केली होती.
सैफने नुकतीच 'एस्क्वायर इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफने महिला प्रोड्युसरने दिलेल्या अजब ऑफरचा खुलासा केला. सैफने सांगितलं की प्रोड्युसरने त्याला १ हजारच्या बदल्यात किस करण्याची ऑफर दिली होती. जेव्हा मी तुला १ हजार रुपये देईन तेव्हा गालावर १० किस द्यायचे, अशी अजब मागणी महिला प्रोड्युसरने सैफकडे केली होती, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.
सैफने त्याच्या बॉलिवूडमधील स्ट्रगलबाबतही भाष्य केलं. तो म्हणाला, "मी सेकंड लीड, थर्ड लीड अशा सगळ्या भूमिका केल्या. काही सिनेमे चांगले होते. पण एक वेळी अशी होती जेव्हा एकामागून एक सगळे सिनेमे फ्लॉप होत होते". सैफने १९९३ साली 'परंपरा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तो दिसला. आता सैफ 'हैवान', 'जिस्म ३' या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.