सैफ अली खाननेने पहिल्यांदाच लेक साराबद्दल केला खुलासा, वाचून भले भले ही होतायेत थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 12:21 IST2020-12-04T12:20:57+5:302020-12-04T12:21:22+5:30

सैफ म्हणाला सारा तिचे काम खूप एन्जॉय करतेय. याच गोष्टीचा जास्त आनंद आहे. सारा तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसह आगामी 'अत्ररंगी रे' सिनेमाचेही शूटिंगमध्ये बिझी आहे.

Saif Ali Khan Revealed That It Funny To See Daughter Sara Ali Khan On Screen Here Is The Reason | सैफ अली खाननेने पहिल्यांदाच लेक साराबद्दल केला खुलासा, वाचून भले भले ही होतायेत थक्क

सैफ अली खाननेने पहिल्यांदाच लेक साराबद्दल केला खुलासा, वाचून भले भले ही होतायेत थक्क

सारा अली खान तिच्या आगामी ‘कुली नंबर 1’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वडील सैफ अली खानने अजूनतरी तिच्या आगामी सिनेमाचा  ट्रेलर पाहिलेला नाही, सध्या हाच ट्रेलर सारा आणि वरून धवनच्या अंडर वॉटर किसींग सीनमुळे जास्त चर्चेत आहे. सैफने तिचा बुहचर्चित सिनेमाचा ट्रेलर पाहिला नसला तरी   सिनेमाची काही गाणी  पाहिली आहेत. यासह सैफने साराला ऑनस्क्रीन पाहणे थोडं मजेशीर आहे हे सांगितले आहे. 

मुंबई मिररशी झालेल्या मुलाखतीत  सैफने साराच्या 'कुली नंबर 1' सिनेमाविषयी बोलताना सांगितले की, एक वडील म्हणून आपल्या लेकीला पडद्यावर पाहताना एक वेगळीच भावना निर्माण होते. तिच्या प्रयत्नाचे मेहनतीने ती स्वतःला सिद्ध करते हे पाहून नक्कीच अभिमानही वाटतो.

साराने  ‘कुली नंबर १’ सिनेमातील काही गाणी दाखवली आहेत, ज्यात वरुण धवन देखील आहे. सैफ म्हणाला सारा तिचे काम खूप एन्जॉय करतेय. याच गोष्टीचा जास्त आनंद आहे. सारा तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसह आगामी 'अत्ररंगी रे' सिनेमाचेही शूटिंगमध्ये बिझी आहे.

करीना कपूरला 'आंटी' म्हणताच लेक सारावर भडकला होता सैफ अली खान, दिली होती सक्त ताकीद

करीना तिच्या सारा आणि तिच्या भावाशी एखाद्या मैत्रिणीसारखं वागते. त्यांच्याशी सगळ्या विषयावर चर्चा करते. पण सुरूवातीला साराच्या मनात करीनाविषयी शंका होती. करीना एवढी मोठी सुपरस्टार असल्यामुळे ती आपल्याशी नीट वागेल का असा प्रश्न तिला पडला होता. पण करीनाने कधीच तिचे स्टारडम नात्यात आणले नाही, असे सारा सांगत होती.


करीना लग्न होऊन घरी आल्यावर तिला काय हाक मारायची असा प्रश्न तिला पडला होता. करीनाला बेबो म्हणावे असे तिला वाटत होते. त्यानंतर आंटी म्हणावे का असा प्रश्न तिला पडला होता. शेवटी तिने सैफलाच हा प्रश्न विचारला. तिचा हा प्रश्न ऐकून सैफ अली खान चांगलाच भडकला.

 

सैफ म्हणाला, आंटी कोणाला म्हणतेस? करीनाला आंटी म्हटले तर ते तिला अजिबात आवडणार नाही. तिला आंटी सोडून अजून काहीही म्हण. सारालाही सैफचे म्हणणे पटले आता सारा अली खान तिला ‘के’ या नावाने हाक मारते.
 

Web Title: Saif Ali Khan Revealed That It Funny To See Daughter Sara Ali Khan On Screen Here Is The Reason