सैफ अली खान 'तानाजी'ध्ये दिसणार जबरदस्त अॅक्शन करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 16:13 IST2019-04-08T16:08:34+5:302019-04-08T16:13:45+5:30
सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये व्यस्त आहे. सैफने नुकतेच 'सेक्रेड गेम्स 2'ची शूटिंग पूर्ण केली आहे.

सैफ अली खान 'तानाजी'ध्ये दिसणार जबरदस्त अॅक्शन करताना
सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये व्यस्त आहे. सैफने नुकतेच 'सेक्रेड गेम्स 2'ची शूटिंग पूर्ण केली आहे. यानंतर तो तानाजीच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. तानाजीमधल्या क्लायमॅक्सच्या सीक्वेंसच्या शूटमध्ये तो बिझी आहे. क्लायमॅक्सचा सीन खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. सिनेमाच्या शेवटला खूप अॅक्शन बघायला मिळणार आहे. ‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ सिनेमात सैफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या सिनेमात अभिनेता अजय देवगन तानाजींची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खानदेखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.२२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे