तैमूरचे फोटो काढल्यामुळे सैफ अली खान झाला नाराज, म्हणाला, बस्स करा... नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 12:47 IST2019-04-13T12:47:34+5:302019-04-13T12:47:57+5:30

सैफ आणि करीना हे दोघेही तैमूरचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सला मनाई करतात.

Saif Ali Khan became angry because of photographing Taimur, said, Boss ... Otherwise ... | तैमूरचे फोटो काढल्यामुळे सैफ अली खान झाला नाराज, म्हणाला, बस्स करा... नाहीतर...

तैमूरचे फोटो काढल्यामुळे सैफ अली खान झाला नाराज, म्हणाला, बस्स करा... नाहीतर...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर व अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान त्याच्या जन्मापासून चर्चेत आहे. इतकेच नाही तर करिना व सैफ पेक्षा त्याची लोकप्रियता जास्त आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेहमी त्याचे व्हिडिओ चर्चेत असतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. सैफ आणि करीना हे दोघेही तैमूरचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सला मनाई करतात.


नुकताच सैफ अली खान व करीना आणि तैमूर एअरपोर्टवर दिसले. त्यावेळी फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढायला सुरूवात केली. सातत्याने फोटो काढत असल्यामुळे सैफ नाराज झाला आणि म्हणाला की, बस करा यार... मुलगा आंधळा होईल. त्यानंतर फोटोग्राफर्सने सैफ व करीनाला थांबून फोटो काढण्यासाठी सांगितले.

तर सैफ म्हणाला की, तुम्हाला फोटो काढायचे आहेत तर काढा पण थांबून इथे पोज देणे विचित्र वाटते.


करीनानेदेखील तैमूरचे फोटो काढण्यावर मुलाखतीत सांगितले आहे की, मी व सैफ तैमूरचे मीडियाला फोटो काढण्यापासून रोकतो. पण त्यांनीदेखील जबाबदारीने वागले पाहिजे. करीनाने पुढे सांगितले की, त्याचा चेहरा आतापासून झाकणे त्याच्यासाठी डेंजरस ठरू शकते. कारण त्याला असे का करतो हे कळणार नाही. तो छोटा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल.


करीनाच्या या वक्तव्यापूर्वी सैफने सांगितले होते की, तैमूरचा कोणी फोटो काढत असेल त्रास नाही. जर कोणाला त्याच्या फोटोतून आनंद मिळत असेल तर त्याच्यासाठी ते आशीर्वादासारखेच आहे.

Web Title: Saif Ali Khan became angry because of photographing Taimur, said, Boss ... Otherwise ...