"एवढ्या मोठ्या सन्मानासाठी...", सई ताम्हणकरने क्रिती सेनॉनसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 13:40 IST2023-08-28T13:24:30+5:302023-08-28T13:40:30+5:30

क्रिती सेनॉनला मिमी या चित्रपटातील भूमिकेसाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सईने ही पोस्ट तिच्यासाठी लिहिली आहे.

Sai tamhankar wrote a special post for Kriti Sanon after she won national award for mimi | "एवढ्या मोठ्या सन्मानासाठी...", सई ताम्हणकरने क्रिती सेनॉनसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली...

"एवढ्या मोठ्या सन्मानासाठी...", सई ताम्हणकरने क्रिती सेनॉनसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली...

मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची २४ जुलैला गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे.६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलिवूडचा डंका पाहायला मिळला.  ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनी नाव कोरलं आहे. अभिनेत्री आलिया भट्टला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी तर क्रिती सेनॉनला मिमी या चित्रपटातील भूमिकेसाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्रितीसाठी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे. 

2021 साली आलेला अभिनेत्री क्रितीचा 'मिमी' प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. मराठी सिनेमा 'मला आई व्हायचंय'चा तो हिंदी रिमेक होता. 'मिमी' मध्ये क्रिती सेननच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक झालं. शिवाय मराठमोळ्या अभिनेत्रीनेही सिनेमात लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्री सई ताम्हणकरने सिनेमात क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

क्रितीने राष्ट्रीय  पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर अलीकडेच तिच्यासाठी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील काही फोटो शेअर करत सईने क्रितीचे अभिनंदन करत खास पोस्ट शेअर केली आहे. 

सईने लिहिले, ''एवढ्या मोठ्या सन्मानासाठी आणि यशाबद्दल माझ्या सुंदरीचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. पंकज त्रिपाठीजी आम्ही तुमची खूप आठवण काढली. तुमचेही अभिनंदन, तुमच्याकडून खूप शिकलो आहे, शिकत राहू.'' पंकज यांनाही 'मिमी'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. क्रितीच्या या सक्सेस पार्टीमध्ये या सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजेच अभिनेते पंकज त्रिपाठी अनुपस्थित होते.

सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये या दोघींमधील बाँडिंग दिसते आहे. शिवाय या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबतचेही फोटो सईने शेअर केले.

Web Title: Sai tamhankar wrote a special post for Kriti Sanon after she won national award for mimi