काय सांगता! म्हणून प्रभासने चक्क 'साहो'ची रिलीज डेट बदलली, आता या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 11:34 IST2019-07-19T11:34:16+5:302019-07-19T11:34:27+5:30

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी सिनेमा 'साहो'ची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघत आहेत

Sahoo release date postponed now releasing on 30 august | काय सांगता! म्हणून प्रभासने चक्क 'साहो'ची रिलीज डेट बदलली, आता या तारखेला होणार रिलीज

काय सांगता! म्हणून प्रभासने चक्क 'साहो'ची रिलीज डेट बदलली, आता या तारखेला होणार रिलीज

ठळक मुद्दे'साहो'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे

साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी सिनेमा 'साहो'ची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघत आहेत. सिनेमाची घोषणा झाल्यापासून साहो वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. सिनेमाचा टीझर आणि पहिले गाणं आऊट झाले आहे या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.  


मात्र 'साहो'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा 'साहो' 15 ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र आता 30 ऑगस्टपर्यंत प्रेक्षकांना याची वाट पाहावी लागणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार 15 ऑगस्टला शारवानंद स्टारर 'रानारंगम' आणि अदिवि शेषचा सिनेमा 'इवारु' रिलीज होतोय त्यामुळे साहोची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  

याशिवाय बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार स्टारर 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस'सुद्धा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.  
'साहो'बाबत बोलायचे झाले तर त्यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Sahoo release date postponed now releasing on 30 august