Raj Kundra Porn case: ‘न्यूड ऑडिशन’ला नकार दिल्यामुळे जीवेमारण्याची धमकी,अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 12:12 IST2021-07-23T12:05:04+5:302021-07-23T12:12:08+5:30

फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सागरिकाने एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा अश्लील चित्रपट बनविण्यात काम कतर असल्याचे प्रकरण समोर आणले होते. सागरिकाला व्हिडिओ कॉलद्वारे वेब सिरीजसाठी ऑडिशन देण्यास सांगण्यात आले होते. जेथे तीन लोकांनी तिच्याकडे न्यु़डऑडिशनची मागणी केली होती. त्यातील एक राज कुंद्रा होता असे तिने सांगितले.

Sagarika Suman Makes Shocking Allegations Against Raj Kundra Said Getting Death threats | Raj Kundra Porn case: ‘न्यूड ऑडिशन’ला नकार दिल्यामुळे जीवेमारण्याची धमकी,अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Raj Kundra Porn case: ‘न्यूड ऑडिशन’ला नकार दिल्यामुळे जीवेमारण्याची धमकी,अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्रावर आणखी एका अभिनेत्रीने धक्दायक आरोप केले आहेत. अभिनेत्री सागरिका सोना सुमनने राजकुंद्रा विरोधात एक धक्कादायक खुलासा केला आहे. राज कुंद्राने सागरिकाचा न्युड ऑडिशन द्यायला सांगितलं होतं पण यासाठी नकार दिल्यानंतर तिला थेट कॉल आणि मेसेज करून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे गौप्यस्फोट तिने केला आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या मुलाखतीत सागरिकाने ही धक्कादायक माहिती सांगितली आहे  “मला खूप भीतीही वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहेत आणि राज कुंद्राने काय चूक केली आहे? असा प्रश्नही विचारत असल्याचे  सागरीकाने सांगितले आहे. 

विशेष म्हणजे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सागरिकाने एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा अश्लील चित्रपट बनविण्यात काम कतर असल्याचे प्रकरण समोर आणले होते. सागरिकाला व्हिडिओ कॉलद्वारे वेब सिरीजसाठी ऑडिशन देण्यास सांगण्यात आले होते. जेथे तीन लोकांनी तिच्याकडे न्यु़डऑडिशनची मागणी केली होती. त्यातील एक राज कुंद्रा होता असे तिने सांगितले. 

राज कुंद्रा विरोधात कडक कारवाई केली जावी असी मागणी सागरिकाने केली आहे. अनेकांना काम मिळवून देण्याच्या खोटे आश्वासन दिली जातात. अशाप्रकारच्या चुकींच्या कामात अडकवले जाते, या नवीन अभिनेत्री बळी पडतात.वीन कलाकारांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी चुकीच्या व्यक्तींच्या जाळ्यात अडकत नसल्याची आधीच शहानिशा करावी त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्याचा तिने सांगितले आहे. 
 

Web Title: Sagarika Suman Makes Shocking Allegations Against Raj Kundra Said Getting Death threats