सचिनच्या लेकीला आवडते 'ही' बॉलीवूड अभिनेत्री, सारा तेंडुलकरने शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:44 AM2024-03-06T11:44:34+5:302024-03-06T11:44:55+5:30

नुकतेच साराच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar's favorite actress is Rani Mukerji shared a picture with her 'forever favourite | सचिनच्या लेकीला आवडते 'ही' बॉलीवूड अभिनेत्री, सारा तेंडुलकरने शेअर केला खास फोटो

सचिनच्या लेकीला आवडते 'ही' बॉलीवूड अभिनेत्री, सारा तेंडुलकरने शेअर केला खास फोटो

सचिन तेंडुलरकरची (Sachin Tendulkar ) लेक सारा (Sara Tendulkar ) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. साराने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली की चाहत्यांची झुंबड उडते. त्याचबरोबर साराच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरही बारीक लक्ष असतं. नुकतेच साराच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगर येथे भव्य पद्धतीने पार पडला. त्यांचा विवाहपूर्व सोहळा १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तेंडुलकर कुटुंबीय हे सहभागी झाले होते. या सोहळ्यातील एक खास फोटो सचिन तेंडुलकरची लेक साराने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. साराने तिच्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. 

सारा तेंडुलकरची आवडती अभिनेत्री ही राणी मुखर्जी आहे. साराने अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात राणीसोबत खास सेल्फी घेतला. या फोटोला सचिनच्या लेकीने 'माय फॉरएव्हर फेव्हरेट' (Widest Smiles With My Forever Favourite ) असं कॅप्शन दिलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. साराची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. शुभमन गिल याच्यासोबत तिचं नाव जोडले जाते. सोशल मीडियावर त्यांच्या अफेअयरच्या चर्चा वारंवार चालू असतात.  सारा तेंडुलकरचा डिपफेक फोटोही व्हायरल झाला होता. त्यामध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल असल्याचे भासवण्यात आले होते. त्यावर सारा तेंडुलकरने संताप केला होता. तसेच असं कृत्य करणाऱ्यांना सुनावले होते. सारा तेंडुलकर क्रिकेट सामने पाहण्यासाठी अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये हजर असते. सारा अथवा शुभमन गिल यांच्याकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Web Title: Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar's favorite actress is Rani Mukerji shared a picture with her 'forever favourite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.