Sachin Tendulkar wrote on Twitter: ‘या’ दिवशी येणार ‘सचिन’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 16:27 IST2017-02-13T10:53:22+5:302017-02-13T16:27:14+5:30
काही महिन्यांपूर्वी आपण कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहिला. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा ...

Sachin Tendulkar wrote on Twitter: ‘या’ दिवशी येणार ‘सचिन’!
क ही महिन्यांपूर्वी आपण कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट पाहिला. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता आणखी एका महान क्रिकेटपटूच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे. होय, क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याच्यावरचा चित्रपट. ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’ असे नाव असलेला हा बायोपिक कधी रिलीज होणार, याकडे सचिनचे चाहते डोळे लावून बसले आहेत. तुम्हीही सचिनचे चाहते असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’ची रिलीज डेट!!
याचवर्षी २६ मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.स्वत:च्या टिष्ट्वटर अकाऊंटवर सचिनने या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली. खुद्द सचिनने या चित्रपटाच्या एका पोस्टरसह रिलीज डेटचा खुलासा केला. मला लोक सर्रास एकच प्रश्न विचारताहेत. याच प्रश्नाचे उत्तर देतोय. तुमच्या कॅलेंडरमध्ये ही तारीख नोंदवून ठेवा. ही डेट आहे, २६ मे २०१७. याच दिवशी ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’ रिलीज होतोय, असे सचिनने लिहिले आहे.
सोबतच चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर केले. यात बॅट उंचावत प्रेक्षकांना अभिवादन करणारा त्याचा हात दिसतोय. यातील बॅट तिरंग्याच्या रूपात दिसते आहे. आपल्या २०० व्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचदरम्यान सचिनने हीच बॅट वापरली होती.
जेम्स इर्स्कीन दिग्दर्शित या चित्रपटाला एआर रहमान याने संगीत दिले आहे. आधी हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज होणार, असे सांगितले गेले होते. मात्र आता ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्याचे दिसतेय. चॅम्पियन ट्रॉफीच्या तोंडावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

The answer to the question that everyone's asking me is here. Mark your calendars and save the date. @SachinTheFilm releases 26.05.17 pic.twitter.com/aS0FGNjGKY— sachin tendulkar (@sachin_rt) 13 February 2017