सब्यसाचीने घेतली माघार; विरोधानंतर 'ती' जाहिरात हटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:46 PM2021-11-01T12:46:11+5:302021-11-01T12:50:46+5:30

Sabyasachi mukherjee: काही दिवसांपूर्वी सब्यसाची यांनी 'इंटिमेट फाइन ज्वेलरी' हे नवीन दागिण्यांचं कलेक्शन लाँच केलं. यात काही स्त्री-पुरुषांचं बोल्ड फोटोशूट दाखवण्यात आलं आहे.

sabyasachi mukherjee deleted that controversial mangalsutra new design advertisement | सब्यसाचीने घेतली माघार; विरोधानंतर 'ती' जाहिरात हटवली

सब्यसाचीने घेतली माघार; विरोधानंतर 'ती' जाहिरात हटवली

googlenewsNext

प्रसिद्ध सेलिब्रेटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) यांनी ‘इंटिमेट फाइन ज्वेलरी’ (Intimate Fine Jewellery)  कलेक्शनची वादग्रस्त जाहिरात हटवली आहे. सोबतच त्यांनी जाहीरपणे माफीदेखील मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जाहिरातीवरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. सामान्यांपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी या जाहिरातीचा निषेध केला होता. इतकंच नाही तर काही राजकीय नेत्यांनी कारवाईचा इशारादेखील दिला होता.

सब्यासाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचं निवेदन जारी केलं असून त्यात त्यांनी एका ठराविक वर्गाच्या भावना दुखावल्या प्रकरणी माफी मागितली आहे. तसंच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही ती जाहिरात हटवण्यात आली आहे.

'त्या' जाहिरातीमुळे सब्यसाची यांच्या अडचणीत वाढ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

काय आहे सब्यसाची यांची पोस्ट?

"वारसा आणि संस्कृतीला dynamic conversation करण्याच्या संदर्भात होती. मंगळसूत्र मोहिमेचा उद्देश हा सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण यावर व्यक्त होण्यासाठी होता. या मोहिमेचा उद्देश केवळ एक सण म्हणूनच होता. परंतु, त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला असून आम्हाला या प्रकरणी अत्यंत वाईट वाटत आहे. म्हणूनच आम्ही सब्यसाचीने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे", अशी पोस्ट सब्यसाची यांनी लिहिली आहे.

काय आहे सब्यसाची यांची जाहिरात?

काही दिवसांपूर्वी सब्यसाची यांनी 'इंटिमेट फाइन ज्वेलरी' हे नवीन दागिण्यांचं कलेक्शन लाँच केलं. यात काही स्त्री-पुरुषांचं बोल्ड फोटोशूट दाखवण्यात आलं आहे. यात काही मॉडल्सने बोल्ड कपडे परिधान करुन त्यावर मंगळसूत्र घातलं आहे. त्यामुळे केवळ एका मंगळसूत्राची जाहिरात करण्यासाठी इतक्या बोल्ड फोटोशूटची गरज काय होती?  असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. सोबतच त्यांनी ट्रोल करण्यासही सुरुवात केली. 

या मंगळसूत्राची किंमत माहितीये का?

सब्यसाची यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर मंगळसूत्राच्या डिझाईनचे काही फोटो शेअर केले आहेत. यात या मंगळसूत्राची किंमत तब्बल 1 लाख 65 हजार रुपयांपासून सुरू होते. 

दरम्यान, नुकतीच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी जाहीरपणे सब्यसाचीवर टीकास्त्र डागलं होतं. 'ही जाहिरात २४ तासांच्या आता हटवली नाही तर कायदेशीर कारवाई करु', असा थेट इशारा त्यांनी दिला होता.  त्यानंतर सब्यसाची यांनी ही जाहिरात हटवल्याचं दिसून येत आहे. 

Web Title: sabyasachi mukherjee deleted that controversial mangalsutra new design advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.