इरफान खानच्या ‘या’ हिरोईनचे फोटो पाहून खवळले पाकिस्तानी! काढली लाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 10:55 IST2018-07-24T10:51:32+5:302018-07-24T10:55:11+5:30

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तिचे आॅनलाईन लीक झालेले फोटो. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हे हटकून आठवणार. 

saba qamar trolled after private photos leaked | इरफान खानच्या ‘या’ हिरोईनचे फोटो पाहून खवळले पाकिस्तानी! काढली लाज!!

इरफान खानच्या ‘या’ हिरोईनचे फोटो पाहून खवळले पाकिस्तानी! काढली लाज!!

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तिचे आॅनलाईन लीक झालेले फोटो. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हे हटकून आठवणार. कारण लीक झालेल्या या फोटोत सबाच्या हातात सिगारेट दिसतेय. साहजिकचं तिचे हे फोटो पाहून पाकिस्तानींची माथी भडकली आहेत. केवळ तिच्या हातातील सिगारेटचं नाही तर तिच्या पारदर्शक शर्टवरूनही पाकिस्तानी संतापले आहेत. त्यामुळे सबाविरोधात सध्या सोशल मीडियावर आग ओकली जात आहेत. अनेकांनी तिचे हे फोटो पाहून अश्लिल कमेंट्स केल्या आहेत. सबाचे हे फोटो एका फोटोशूटदरम्यानचे आहेत.

 यापूर्वी माहिरा खानही अशाच एका वादातून गेली होती. रणबीर कपूर आणि माहिरा या दोघांचे सिगारेटचे झुरके घेत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळीही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी माहिरा खानला नाही नाही ते सुनावले होते.   सबाबाबतीतही हेच घडताना दिसतेय. आता तूही माहिरा खानच्या वाटेवर निघालीस का? थोडी लाज बाळग, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पडल्या आहेत.http://www.lokmat.com/bollywood/paki-actress-saba-kamar-bawlali-dabang-khan-salman-fighter/
सबा कमर बॉलिवूडमध्येही दिसलेली आहे. इरफान खानच्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात सबा दिसली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे बरेच कौतुकही झाले होते. पण सबा बॉलिवूडमध्ये आणखी चित्रपट करण्याआधीच, भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादण्याची मागणी होऊ लागली आणि या मुद्यावरून अन्य पाकिस्तानी कलाकारांप्रमाणे सबाला सुद्धा आपल्या देशात काम शोधावे लागले.

 

Web Title: saba qamar trolled after private photos leaked