ही अभिनेत्री लवकरच करणार आपल्या फॅनसोबत लग्न, सोशल मीडियाद्वारे त्याने केले प्रपोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 19:24 IST2021-03-26T19:24:11+5:302021-03-26T19:24:35+5:30
एका अभिनेत्रीला तिच्या फॅनने सोशल मीडियाद्वारे प्रपोज केले असून तिने देखील त्याला होकार दिला आहे.

ही अभिनेत्री लवकरच करणार आपल्या फॅनसोबत लग्न, सोशल मीडियाद्वारे त्याने केले प्रपोज
आफताब शिवदासानी आणि उर्मिला मातोंडकर यांची मुख्य भूमिका असलेला मस्त हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल ना... या चित्रपटात एक अभिनेत्री तिच्या फॅनसोबत लग्न करते असे आपल्याला पाहायला मिळाले होते. पण खऱ्या आयुष्यात कोणत्या अभिनेत्रीने आपल्या फॅनसोबत लग्न केलेले आपण ऐकले आहे का पण आता एका अभिनेत्रीच्या बाबतीत हे खरे होणार आहे.
इरफान खानच्या ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटामध्ये आपल्याला त्याच्यासोबत सबा कमरला पाहायला मिळाले होते. तिची या चित्रपटातील भूमिका सगळ्यांना भावली होती. या चित्रपटामुळे तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले. सबा ही पाकिस्तानी अभिनेत्री असून ती तिथे चांगलीच फेमस आहे.
सबा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकताच तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करत तिच्या एका चाहत्याने तिला लग्नाची मागणी घातली असून तिने देखील होकार दिला आहे.
सबाच्या फोटोवर अजीम संगने कमेंट करून तू माझ्याशी लग्न करशील का असे विचारले त्यावर सबाने देखील कबूल है असे उत्तर दिले आहे. अजीम हा पाकिस्तानमधील प्रसिद्ध ब्लॉगर आहे. त्यामुळे अजीम आणि सबा लग्न करणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.