Saaho Movie: प्रभासच्या चाहत्यांनी काय केले एकदा बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 14:35 IST2019-08-29T14:30:32+5:302019-08-29T14:35:38+5:30

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. उद्या 30 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

saaho actor prabhas fans goes crazy, put up his 200 feet wide banners along the side of the road | Saaho Movie: प्रभासच्या चाहत्यांनी काय केले एकदा बघाच!

Saaho Movie: प्रभासच्या चाहत्यांनी काय केले एकदा बघाच!

ठळक मुद्दे2 तास 51 मिनिटांच्या या चित्रपटात प्रभास जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

‘बाहुबली’ प्रभासचासाहो’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. उद्या 30 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  कधी एकदा हा चित्रपट प्रदर्शित होतो, असे प्रभासच्या चाहत्यांना झाले आहे.  काही चाहत्यांनी काय करावे तर चक्क ‘साहो’चे 200 फुट लांब बॅनर तयार करून ते रस्त्याच्या कडेला लावले आहे.


होय, प्रभासचे होमटाऊन असलेल्या आंध्रप्रदेशातील भीमावरम येथील  चाहत्यांनी हे बॅनर तयार केले. या बॅनरचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या बॅनरवरचे प्रभासचे वेगवेगळे लूक सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय झाला आहे.


350 कोटी रूपयांचा बजेट असलेला ‘साहो’ हा देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट असल्याचे म्हटले जातेय. केवळ इतकेच नाही तर चित्रपटाच्या केवळ एका सीनवर 75 कोटी रूपये खर्च केले गेलेत.बॉलिवूड गर्ल श्रद्धा कपूर या चित्रपटात प्रभाससोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

तिच्याशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अर्जुन विजय, एवलिन शर्मा, टीनू आनंद यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आधी हा चित्रपट गत 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण नंतर ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.


2 तास 51 मिनिटांच्या या चित्रपटात प्रभास जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तूर्तास सोशल मीडियावर ‘साहो’चे काही रिव्ह्यू  व्हायरल होत आहेत. बुधवारी युएईमध्ये ‘साहो’चे स्पेशल स्क्रिनिंग झाले. यात प्रभासच्या दमदार अ‍ॅक्टिंग आणि अ‍ॅक्शनची प्रचंड कौतुक केले गेले आहे. पण चित्रपटाची कथा, व्हीएफएक्स क्वालिटीवर टीकाही होतेय. काहींनी हा चित्रपट कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे.

Web Title: saaho actor prabhas fans goes crazy, put up his 200 feet wide banners along the side of the road