Video: वेगवेगळ्या गाडीने आलेत आणि मग..., सिद्धार्थ व कियारा मालदीवमध्ये साजरा करणार थर्टी फर्स्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 12:54 IST2021-12-28T12:52:23+5:302021-12-28T12:54:27+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra ) व कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी अद्याप आपलं नातं ऑफिशिअल केलेलं नाही. पण आता कदाचित सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही...

Rumoured lovebirds Sidharth Malhotra and Kiara Advani off for New Year vacay | Video: वेगवेगळ्या गाडीने आलेत आणि मग..., सिद्धार्थ व कियारा मालदीवमध्ये साजरा करणार थर्टी फर्स्ट

Video: वेगवेगळ्या गाडीने आलेत आणि मग..., सिद्धार्थ व कियारा मालदीवमध्ये साजरा करणार थर्टी फर्स्ट

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra ) व कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी अद्याप आपलं नातं ऑफिशिअल केलेलं नाही. पण आता कदाचित सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही. सिद्धार्थ व कियारा काहीही बोलायला तयार नसले तरी खुल्लमखुल्ला फिरताना मात्र दिसतात. आज सकाळी हे लव्हबर्ड्सला मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले आणि एकत्रच न्यू ईअर सेलिबे्रशनसाठी रवाना झालेत.

सिद्धार्थ व कियारा दोघंही वेगवेगळ्या कारने एअरपोर्टवर आलेत. पण नंतर दोघंही एकत्र रवाना झालेत. कुठे तर मालदीवला. होय, कियारा व सिद्धार्थ मालदीवमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट करणार आहेत. यावेळी सिद्धार्थ ग्रीन जॅकेट, ब्लॅक जीन्स व व्हाईट शर्टमध्ये दिसला तर कियारा पिंक कलरच्या विंटर वेअरमध्ये दिसली.  पासपोर्ट वगैरे चेक झाल्यानंतर दोघांनी एकत्र एअरपोर्टवर एन्ट्री घेतली.

  चर्चा खरी मानाल तर नव्या वर्षात सिद्धार्थ व कियारा त्यांचं नातं ऑफिशिअल करू शकतात. सिद्धार्थ व कियाराचं नातं अगदी सुरूवातीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे लग्नाचा निर्णय त्यांच्यासाठी घाईचा ठरेल.  

सूत्रांनी सांगितल्यानुसार, तूर्तास हे कपल लग्नाच्या विचारात नाही. पण लवकरच ते त्यांच्या नात्याची कबुली देऊ शकतात.  आम्ही कपल आहोत, असं ते जाहिर करू शकतात. दोघांनीही एकमेकांच्या पालकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत आणि कुटुंबीयांकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. अशात ऑफिशिअल कपल म्हणून दोघेही जगासमोर येऊ शकतात.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर सिद्धार्थ व कियाराकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. मिशन मजनू,योद्धा आणि थँक्स गॉड या चित्रपटात सिद्धार्थची वर्णी लागली आहे. यापैकी ‘मिशन मजनू’हा सिनेमा 13 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे तर ‘थँक्स गॉड’ हा सिनेमा पुढील वर्षी 29 जुलैला चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘योद्धा’ हा सिद्धार्थचा आणखी एक सिनेमाही पुढील वर्षाअखेर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कियारा सुद्धा भुल भुलैय्या, जुग जुग जिओ, गोविंद नाम मेरा, आरसी 15 या चित्रपटांत झळकणार आहे.

Web Title: Rumoured lovebirds Sidharth Malhotra and Kiara Advani off for New Year vacay