मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:06 IST2025-05-21T11:03:55+5:302025-05-21T11:06:31+5:30

रुची गुर्जरने आपल्या अनोख्या पोशाखामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ruchi Gujjar Cannes 2025 Modi Necklace Look | मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

Ruchi Gujjar Cannes 2025: फ्रान्समधील कान्स शहरात ७८ वा कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या जोरात सुरू आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या हटके आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असतात. यंदा, भारतीय मॉडेल रुची गुर्जरने आपल्या अनोख्या पोशाखामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रुची गुर्जरने २०२५ च्या कान्स महोत्सवात असं काही केलं की तिचा लूक चर्चेचा विषय ठरला. ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर अवतरली होती. कान्स महोत्सवातील रुची गुर्जरचा लूक पाहता ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी चाहती असल्याचं दिसून आलं. तिचा हा हटके अंदाज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, तर काहींनी तिचं जोरदार कौतुक केलं. सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.


रुची गुर्जर कोण आहे?
रुची गुर्जर हिचा जन्म राजस्थानमधील एका गुर्जर कुटुंबात झाला. ती एक व्यावसायिक मॉडेल असून २०२३ मध्ये तिने 'मिस हरियाणा' हा किताब जिंकला होता. सध्या ती मुंबईत मॉडेलिंग प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे. रुची गुर्जरने अभिनय क्षेत्रातही आपली छाप सोडली आहे. तिची दोन गाणी यूट्यूबवर प्रचंड व्हायरल झाली आहेत. या गाण्यांना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक केलं आहे. सध्या तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ८ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.

 

Web Title: Ruchi Gujjar Cannes 2025 Modi Necklace Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.