RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अॅक्शन सीन शूट करणार आलिया भट
By तेजल गावडे | Updated: October 28, 2020 17:23 IST2020-10-28T17:22:21+5:302020-10-28T17:23:30+5:30
आलिया भट पुढील आठवड्यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत आरआरआर चित्रपटातील एक सीन शूट करण्यासाठी हैदराबादला जाणार आहे.

RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अॅक्शन सीन शूट करणार आलिया भट
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आगामी दिवसात खूप व्यग्र राहणार आहे. तिचे बरेच प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहे आणि काही प्रोजेक्ट्सचे शूटिंग चालू आहे. सध्या ती संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान असे वृत्त समोर आले आहे की पुढील आठवड्यात आलिया भट एसएस राजामौली यांच्या मल्टीस्टारर चित्रपट आरआरआरच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.
पुढील आठवड्यात आलिया हैदराबादला जाणार आहे आणि तिथे ती चित्रपटातील इतर क्रू मेंबर्सना जॉइन करणार आहे. ती पुढील आठवड्यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत शूटिंग करणार आहे. यादरम्यान ती एक टक्करवाला सीन शूट करणार आहे.
मिड डे वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते तेव्हा आलियाचा फक्त एक सीन शूट करणे बाकी होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सोबत समोरासमोरचा सीन शूट करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला हा सीन पुण्यातील एका बंगल्यात शूट केला जाणार होता पण महारोगराईचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्लाननध्ये बदल झाला आहे. सीनमध्ये आलिया आणि सीताराम राजूचा सामना भीम या पात्राशी होणार आहे.
सध्या आलिया भट बऱ्याच चित्रपटात व्यग्र आहे. जर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर ती गंगूबाई काठियावाडी, ब्रह्मास्त्र, आरआरआर या सारख्या मोठ्या चित्रपटात झळकणार आहे.