​कबीर खानसोबत काम करण्याची हृतिक रोशनची इच्छा 2018 या वर्षात होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 09:37 AM2017-01-28T09:37:26+5:302017-01-28T15:07:26+5:30

कबीर खानने एक था टायगर, बजरंगी भाईजान, काबूल एक्सप्रेस यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची ...

Roshan will be happy to work with Kabir Khan in 2018 this year | ​कबीर खानसोबत काम करण्याची हृतिक रोशनची इच्छा 2018 या वर्षात होणार पूर्ण

​कबीर खानसोबत काम करण्याची हृतिक रोशनची इच्छा 2018 या वर्षात होणार पूर्ण

googlenewsNext
ीर खानने एक था टायगर, बजरंगी भाईजान, काबूल एक्सप्रेस यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची इच्छा आहे. पण अभिनेता हृतिक रोशनलादेखील कबीरसोबत काम करायचे आहे. पण काही केल्या या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळतच नाहीये. 
यंदाचे वर्षं हे हृतिक रोशनसाठी खूप चांगले आहे असे म्हटले जर चुकीचे ठरणार नाही. कारण हृतिकसाठी वर्षाची सुरुवात खूपच चांगली झाली आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला काबिल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे आणि आता याच वर्षांत कबीर खानसोबत काम करण्याची त्याची अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे.
कबीर खान दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात हृतिक प्रमुख भूमिका साकारणार असून या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. 
कबीर आणि हृतिक गेल्या कित्येक वर्षांसोबत साजिदची निर्मिती असलेल्या चित्रपटात काम करण्याचा विचार करत होते. पण कबीर काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. त्यानंतर तो सलमानसोबत ट्युबलाइट हा चित्रपट करत आहे. त्यामुळे कबीर खानकडे वेळच नव्हता. तसेच हृतिक त्याच्या मोहेंजोदडो या चित्रपटाच्या चित्रीकरणात गेल्या वर्षापासून व्यग्र होता. त्यामुळे कबीर आणि हृतिकचा वेळ कधी जमून आलाच नाही. पण या वर्षी काहीही केल्या आपण तिघांनी एकत्र काम करायचे असे हृतिक रोशन, कबीर खान आणि साजिद नाडियाडवाला यांनी ठरवले आहे. या वर्षांत ते तिघे त्यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.  

Web Title: Roshan will be happy to work with Kabir Khan in 2018 this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.