"मी त्याचा जीवच घेतला असता", Swiggy डिलिव्हरी बॉयवर भडकला रोनित रॉय; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:08 AM2024-02-26T11:08:42+5:302024-02-26T11:09:13+5:30

"तुम्हाला त्यांच्या जीवाची पर्वा नाही का?", रोनित रॉयचा Swiggy वर संताप

ronit roy angry reaction on swiggy delivery boy who is riding in wrong way said i almost killed him | "मी त्याचा जीवच घेतला असता", Swiggy डिलिव्हरी बॉयवर भडकला रोनित रॉय; नेमकं काय घडलं?

"मी त्याचा जीवच घेतला असता", Swiggy डिलिव्हरी बॉयवर भडकला रोनित रॉय; नेमकं काय घडलं?

'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिकेत मिहिरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे रोनित रॉय. अनेक गाजलेल्या हिंदी मालिका आणि सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्याने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. रोनित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्याने केलेल्या एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. रोनितने Xवरुन स्विगीच्या डिलिव्हरी बॉय संदर्भात एक ट्वीट केलं आहे. 

उलट दिशेने गाडी चालवणाऱ्या Swiggy डिलिव्हरी बॉयवर रोनित भडकला आहे. ट्वीट करत त्याने संताप व्यक्त केला आहे. "Swiggy तुमच्या एका रायरडला मी मारुनच टाकलं असतं. त्यांना गाडी चालवण्याच्या सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. छोट्या इलेक्ट्रिक मोपेड चालवणं म्हणजे ट्राफिकमध्ये चुकीच्या दिशेने गाडी चालवणे नव्हे. तुम्हाला त्यांच्या जीवाची पर्वा नाही का? की हा फक्त व्यवसाय आहे आणि नेहमीप्रमाणे सगळं सुरू राहील?" असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

रोनितच्या या ट्वीटवर Swiggy ने रिप्लाय केला आहे. "रोनित, आमच्या डिलिव्हरी पार्टनरने ट्राफिकचे नियम पाळावेत अशी आमची अपेक्षा असते. या प्रकरणात आम्ही लक्ष घालू. तुम्ही याबद्दल अधिक माहिती देऊ शकलात तर आम्हाला कारवाई करता येईल," असं Swiggyने म्हटलं आहे. 

दरम्यान, रोनितने लग्नाच्या २०व्या वाढदिवसानिमित्त पत्नी नीलम रॉयसह पुन्हा विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हादेखील रोनित चर्चेत आला होता. 

Web Title: ronit roy angry reaction on swiggy delivery boy who is riding in wrong way said i almost killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.