फरहान अख्तरने शेअर केलेला गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचा सगळ्यात रोमाँटिक फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 13:02 IST2021-02-15T12:58:57+5:302021-02-15T13:02:09+5:30

Farhan Akhtar share romantic photo with Shibani Dandekar : सोशल मीडियावरील त्यांच्यातले बॉन्डिंग जगजाहीर आहे.

The romantic photo with girlfriend shibani dandekar shared by farhan akhtar | फरहान अख्तरने शेअर केलेला गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचा सगळ्यात रोमाँटिक फोटो!

फरहान अख्तरने शेअर केलेला गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचा सगळ्यात रोमाँटिक फोटो!

प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर दीर्घकाळापासून मॉडेल शिबानी दांडेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.  फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल बोलत नाहीत पण सोशल मीडियावरील त्यांच्यातले बॉन्डिंग जगजाहीर आहे.  सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात आणि ट्रोर्लस त्यांना ट्रोल करत असतात. फरहान अख्तरने शिबानीसोबतचा सोबत रोमाँटिक फोटोमुळे शेअर केला आहे. या फोटोसोबत फरहानने Today. Tomorrow. Forever, असे कॅप्शन दिले आहे. फरहान आणि शिबानीचा हा फोटो सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होतोय. या फोटोत फरहान आणि शिबानीच्या मागे अथांग समुद्र दिसतो आहे. 

बी-टाऊनमध्ये फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा होत्या मात्र सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याचे या कपलचे म्हणणे आहे. ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्याची सध्या त्यांना गरज वाटत नाहीये. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत.


फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर तो प्रियांका चोप्रासमवेत अभिनेता शेवटच्या काळात ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारसे कामगिरी केली नाही. आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहराच्या 'तूफान' चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: The romantic photo with girlfriend shibani dandekar shared by farhan akhtar