प्रतीक बब्बर 'मुल्क' चित्रपटात साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 11:49 IST2018-07-30T11:46:39+5:302018-07-30T11:49:35+5:30

'मुल्क' सिनेमात प्रतीक बब्बर वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.

 This role will be played in the film 'Babul' Mulk | प्रतीक बब्बर 'मुल्क' चित्रपटात साकारणार ही भूमिका

प्रतीक बब्बर 'मुल्क' चित्रपटात साकारणार ही भूमिका

ठळक मुद्देप्रतीक बब्बर साकारणार आतंकवाद्याची भूमिका'मुल्क' चित्रपटाची कथा फिरते एका मुस्लीम कुटुंबाभोवती

तापसी पन्नू व ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मुल्क' चित्रपटाबाबतची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो या सिनेमात वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांचा उपयोग या चित्रपटातील भूमिकेसाठी केल्याचे प्रतीकने सांगितले. 


'मुल्क' चित्रपटात प्रतीक बब्बर एका आतंकवाद्याची भूमिका साकारतो असून याबाबत तो म्हणाला की, 'शाहीद नामक आतंकवाद्याची भूमिका मी साकारत असून ही भूमिका साकारण्यापूर्वी आपण मनात एक शाहीदची छवी साकारून आपल्या जीवनातूनच प्रेरणा घेतली आहे. तरूण वयात जर तुम्हाला चुकीची संगत लाभली तर आयुष्य पूर्णतः भरकटते माझ्या आयुष्यातदेखील ही वेळ आली होती. तुमच्या मनावर अशा अवस्थेत खूपच प्रभाव पडतो आणि अशा मनस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं आणि वाईट याची जराही कल्पना नसते. या सर्व गोष्टींमुळेच ही भूमिका साकारणे माझ्यासाठी एक आव्हान होते.'
ऋषी कपूर, आशुतोष राणा, नीना गुप्ता यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. मात्र त्यांच्याबरोबर काम करताना सुरूवातील थोडे दडपण होते. या कलाकारांचे काम इतके उत्तम आहे. त्यामुळे नेहमीच आपले काम चांगले करण्याच्या प्रयत्नात होतो. तसेच आपले काम कसे झाले आहे याबद्दल सतत अनुभव सिन्हा यांना विचारायचो. त्यांनी केलेल्या सूचना ध्यानी ठेवून काम केले, असे प्रतीक सांगत होता. 
 'मुल्क' चित्रपटाची कथा एका मुस्लीम परिवाराभोवती फिरते. या चित्रपटात प्रतीकसह तापसी पन्नू, ऋषी कपूर, आशुतोष राणा, रजत कपूर, नीना कुलकर्णी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे जास्त चित्रीकरण हे लखनऊमधील गल्ल्यांमध्ये करण्यात आले आहे. 'मुल्क' चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title:  This role will be played in the film 'Babul' Mulk