सुरू झाली ‘गोलमाल 5’ची तयारी, रोहित शेट्टीने दिली ‘हिंट’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:40 PM2018-12-18T12:40:05+5:302018-12-18T12:46:09+5:30

‘मसाला’ चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी तूर्तास आपल्या ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढील आठवड्यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ बॉक्स आॅफिसवर धडकणार आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रोहित जिथे जाईल तिथे त्याला ‘गोलमाल 5’बद्दल विचारले जात आहे.

rohit shetty on golmaal 5 the gesture by team golmaal in simmbas song aankh marey was a hint about golmaal 5 | सुरू झाली ‘गोलमाल 5’ची तयारी, रोहित शेट्टीने दिली ‘हिंट’!!

सुरू झाली ‘गोलमाल 5’ची तयारी, रोहित शेट्टीने दिली ‘हिंट’!!

googlenewsNext

‘मसाला’ चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी तूर्तास आपल्या ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढील आठवड्यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ बॉक्स आॅफिसवर धडकणार आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रोहित जिथे जाईल तिथे त्याला ‘गोलमाल 5’बद्दल विचारले जात आहे.  याचे कारण म्हणजे, ‘सिम्बा’मध्ये ‘गोलमाल’ सीरिजच्या कलाकारांनाही कॅमिओ केला आहे. आता ‘गोलमाल 5’बद्दल एक ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाची तयारी सुरु झालीय. होय, खुद्द रोहित शेट्टीने याबद्दल सांगितले.


‘सिम्बा’च्या ‘आंख मारे’ या गाण्यात ‘गोलमाल’ची स्टारकास्ट दिसली. हीच ‘गोलमाल 5’साठी मोठी हिंट आहे, असे रोहित यावेळी म्हणाला.  ‘गोलमाल 5’बद्दल अधिक काही सांगण्यास रोहितने नकार दिला. पण ‘गोलमाल 5’ येणार हे मात्र त्याने सांगितले. ‘गोलमाल’चे चाहते या बातमीने सुखावणार नसतील तर नवल... ‘गोलमाल ’सीरीजमधला पहिला चित्रपट ‘गोलमाल ’ सन २००६ मध्ये आला होता.  त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने ‘गोलमाल रिटर्न्स’आणि ‘गोलमाल 3’ रिलीज झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ घेऊन आला.

‘सिम्बा’ हा रणवीरचा यंदा रिलीज होणारा दुसरा चित्रपट असेल. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाआधी गत जानेवारी रणवीर व दीपिकाचा ‘पद्मावत’ रिलीज झाला होता. ‘सिम्बा’ सिनेमात रणवीर सिंग सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘सिम्बा’ हा  चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.सिम्बा या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. 
 

Web Title: rohit shetty on golmaal 5 the gesture by team golmaal in simmbas song aankh marey was a hint about golmaal 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.