प्रभासच्या ‘सालार’मध्ये 'रॉकी भाई' यश करणार कॅमिओ? चाहते म्हणाले- आता सर्व रेकॉर्ड तोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:36 PM2023-08-28T14:36:18+5:302023-08-28T14:39:59+5:30

प्रभासच्या 'सालार'मध्ये यशचा 5 मिनिटांची कॅमिओ पाहायला मिळेल. पण, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

'Rocky Bhai' cameo success in Prabhas' 'Saalar'? Fans said - now all records will be broken | प्रभासच्या ‘सालार’मध्ये 'रॉकी भाई' यश करणार कॅमिओ? चाहते म्हणाले- आता सर्व रेकॉर्ड तोडणार

सालार चित्रपट

googlenewsNext

सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सालार' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.  या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाला प्रभासचे चाहते तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्याच्या चित्रपटात KGF चा रॉकी भाई म्हणजेच यश दिसणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

प्रसिद्ध ट्विटर हँडल आरव्हीसीजेने (RVCJ) दावा केला आहे की, प्रभासच्या 'सालार'मध्ये यशचा 5 मिनिटांची कॅमिओ  पाहायला मिळेल. पण, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. पण असे झाले तर साऊथचे हे दोन सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमाकूळ घालतील.

Theatres Boooom🔥🥁😎#Salaar#Yash#Prabhaspic.twitter.com/2w5I83BL0Q— RVCJ Kannada (@RVCJKannada) August 26, 2023

'सालार' बद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्साह असून ते 28 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज होण्याची  वाट पाहत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, 'जर हे खरे असेल तर भारतीय सिनेमाच्या इतिहासात असा एकही रेकॉर्ड नाही जो मोडला जाणार नाही. लहान-मोठे असे प्रत्येक विक्रम मोडीत निघणार आहेत. 

चित्रपटांमध्ये बड्या सुपरस्टारच्या कॅमिओमुळे खूप फरक पडतो. याचे उदाहरण या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओ भूमिकेवरून घेता येईल. सध्या चित्रपटांमध्ये मोठ्या स्टार्सचे कॅमिओ बनवण्याचा ट्रेंड बनला आहे, निर्माते या ट्रेंडला फॉलो करताना दिसून येत आहेत. 

Web Title: 'Rocky Bhai' cameo success in Prabhas' 'Saalar'? Fans said - now all records will be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.