वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 12:56 PM2020-04-17T12:56:36+5:302020-04-17T13:01:00+5:30

२०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती.

Riya Sen Shares Super Sexy Look During LockDown-SRJ | वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

वेटरकडे सेक्सची मागणी करणाऱ्या या अभिनेत्रीचा नवा कारनामा, लॉकडाऊन दरम्यान अशा गोष्टी करत लक्ष वेधून घेण्याचा करते प्रयत्न

googlenewsNext

करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या सेक्सी अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं. अभिनेत्री रिया सेन हिनं वयाच्या 19व्या वर्षी स्टाईल या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही. स्टाईल, झनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. तिचा चाहता वर्गही प्रचंड आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. सध्या सर्वच घरी असल्यामुळे रियाकडेही वेळ घालवण्यासाठी दुसरे काही काम नाही. त्यामुळे सध्या तिने तिचे काही निवडक बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसह शेअर करते. तिचे हे फोटो पाहून ऐन ऊन्हाळ्यात तिने असे फोटो शेअर करत हिट वाढवली असल्याचे चित्र आहे. 

नेहमीच अतरंगी गोष्टी करत ती चर्चेत असते. तिचा जुना किस्सा तर आजही लोक विसरलेले नाहीत. ते म्हणजे अभिनेता अश्मित पटेलसोबत असलेल्या अफेअरसह दोघांचा अश्लील एमएमएसही लीक झाला होता. इतकंच नाहीतर रागिनी एमएमएस सिनेमाच्या सेटवर आपल्या पुरुष कोस्टारचे कपडे उतरवल्याचा आरोपही तिच्यावर झाला. अभिनेता निशांत मलकानीने रिया सेनवर गंभीर आरोप केले होते. रागिनी एमएमएस चित्रपटात एक इंटीमेट सीन करताना रियाने आपल्या मर्जीशिवाय कपडे काढल्याचा धक्कादायक खुलासा केला. २०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती. 

मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये गेली त्यावेळी घडलेला किस्सा तर माध्यमांमध्ये रंगला होता. रियाने या रेस्टॉरंन्टच्या वेटरकडे चक्क सेक्सची मागणी केली. खरं तर रियाला डिश ऑर्डर करायची होती. मात्र त्यावेळी रियाने म्हटलं होतं की Could I have some SEX please. हे ऐकून तर वेटरला घामच सुटला. मात्र आपण काही तरी भलतंच बोलून गेल्याचं रियाला उमगलं आणि तिनं ती चूक सुधारली म्हणे..  मात्र तिने वेटरकडे सेक्सची मागणी केली याचीच चर्चा जास्त रंगली. 


 

Web Title: Riya Sen Shares Super Sexy Look During LockDown-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.