"त्याचं हृदय समुद्रासारखं मोठं आहे", अनंत अंबानी-राधिकासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:36 IST2024-03-06T13:35:35+5:302024-03-06T13:36:58+5:30

प्री वेडिंग सोहळ्यानंतर रितेशने राधिका आणि अनंत अंबानीसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

ritesh deshmukh shared special post for anant ambani and radhika merchant after their pre wedding function | "त्याचं हृदय समुद्रासारखं मोठं आहे", अनंत अंबानी-राधिकासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट

"त्याचं हृदय समुद्रासारखं मोठं आहे", अनंत अंबानी-राधिकासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून जिकडेतिकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा आहे. या प्री वेडिंग सोहळ्यात बॉलिवूडसह हॉलिवूड सिताऱ्यांनीही हजेरी लावली होती. त्याबरोबरच अनेक दिग्गजांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. अनंत अंबानी-राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी रितेश देशमुख-जिनिलीयानेही हजेरी लावली होती. आता प्री वेडिंग सोहळ्यानंतर रितेशने राधिका आणि अनंत अंबानीसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

रितेश देशमुखची पोस्ट 

प्रेमात अखंड बुडालेल्या आणि एकमेकांचे होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेल्या या जोडप्याच्या प्रेम आणि आनंदाने भरलेल्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. 

राधिका, तुझं हास्य तुझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. ते अशा सौंदर्याने चमकते जे  बघणाऱ्याला मोहीत करते. तुझे पुढील दिवस तुझ्या तेजस्वी हास्यासारखे आनंद आणि आशीर्वादाने भरलेले राहो. 

अनंत, तुझं हृदय समुद्रासारखं मोठं आहे. तुझं वनताराचं स्वप्न हे केवळ प्रेरणादायीच नाही तर वन्यप्राण्यांसाठी असलेले समपर्ण आहे. तू ज्याप्रमाणे तुझे कुटुंबीय, भावंडे आणि राधिकाबरोबर बोलतोस ते हृदयस्पर्शी आहे.  

तुमच्या या सुंदर प्रवासासाठी हार्दिक अभिनंदन. तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो. आणि तुमच्या नात्यात प्रेमाचा दिवा उजळून तुम्ही अनंतकाळासाठी एकत्र राहो.  

रितेशने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यातील काही फोटोही शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

Web Title: ritesh deshmukh shared special post for anant ambani and radhika merchant after their pre wedding function