‘बायकोकडे लक्ष दे...’ म्हणत डिवचणाऱ्या ट्रोलरला रितेश देशमुखचं गजब उत्तर; वाचा काय म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 10:29 IST2021-09-29T10:28:37+5:302021-09-29T10:29:19+5:30

चीप, वल्गर आंटी म्हणत जेनेलियालाही डिवचलं, तिनेही दिलं खरमरीत उत्तर

riteish deshmukh troll tells focus more on your wife actor epic reply | ‘बायकोकडे लक्ष दे...’ म्हणत डिवचणाऱ्या ट्रोलरला रितेश देशमुखचं गजब उत्तर; वाचा काय म्हणाला

‘बायकोकडे लक्ष दे...’ म्हणत डिवचणाऱ्या ट्रोलरला रितेश देशमुखचं गजब उत्तर; वाचा काय म्हणाला

ठळक मुद्दे रितेश व जेनेलिया यांची पहिली भेट 2003 साली ‘मुझे तेरी कसम’च्या सेटवर झाली होती. यानंतर 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 साली दोघंही लग्नबंधनात अडकले होते.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि त्याची लाडकी बायको जेनेलिया डिसूजा (Genelia D’Souza) म्हणजे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. सोशल मीडियावरचे रितेश व जेनेलियाचे कुल व्हिडीओ चाहत्यांना खळखळून हसवतात. ख-या आयुष्यातही दोघंही तितकेच कुल. रितेश तर जेनेलियापेक्षाही कुल. क्वचितच त्याला कधी कुणावर चिडलेलं बघितलेलं असेल. पण पाणी डोक्यावरून वाहायला लागलं की, नाईलाज होतोच. असंच काहीसं रितेश व जेनेलियाबाबतीत घडलं. ऐरवी ट्रोलर्सकडे फारसं लक्ष न देणाºया या कपलला ट्रोलर्सनी असं काही डिवचलं की, दोघांनाही उत्तर देणं भाग पडलं.
अलीकडे रितेशने पत्नी जेनेलियासोबत अरबाज खानच्या ‘पिंच2’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अरबाजने रितेशला एका ट्रोलरची कमेंट वाचून दाखवली. ट्रोलर्स कशापद्धतीने ट्रोल करतात, हा यामागचा उद्देश.

रितेशने बायकोकडे जरा लक्ष दे, अशी कमेंट एका ट्रोलरने केली होती. अरबाजने ही कमेंट वाचून दाखवली आणि ती ऐकून रितेश जोरजोरात हसू लागला आणि यानंतर काय तर त्यानं या ट्रोलरला खरमरीत उत्तरही दिलं. ‘मलाही वाटतं की, तुम्ही तुमच्या बायकोवर लक्ष द्यावं, माझ्या बायकोवर नाही,’असं रितेश म्हणाला.

चीप, वल्गर आंटी...
एका ट्रोलरने जेनेलियाला ओव्हरअ‍ॅक्टिंग करणारी चीप, वल्गर आंटी म्हटलं. अरबाजने शोमध्ये ही कमेंटही वाचून दाखवली. ही कमेंट पाहून जेनेलिया काहीसी हैराण झाली. तिनेही वल्गर आंटी म्हणणा-या ट्रोलरला उत्तर दिलं. ‘कदाचित याच्या घरात फार काही ठीक नाही. भावा, तू ठीक असशील, अशी अपेक्षा करते,’ असे  जेनेलिया म्हणाली.
अरबाजच्या या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 रितेश व जेनेलिया यांची पहिली भेट 2003 साली ‘मुझे तेरी कसम’च्या सेटवर झाली होती. यानंतर 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 साली दोघंही लग्नबंधनात अडकले होते. दोघांना दोन मुलं आहे.
 
 

Web Title: riteish deshmukh troll tells focus more on your wife actor epic reply