लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुखने शेअर केला जेनेलिया डिसुझासोबतचा रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 18:27 IST2021-02-03T18:27:05+5:302021-02-03T18:27:36+5:30

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिेनेत्री जेनेलिया डिसुझा यांच्या लग्नाचा ९वा वाढदिवस आहे.

Riteish Deshmukh shares romantic photo with Genelia D'Souza on their wedding anniversary | लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुखने शेअर केला जेनेलिया डिसुझासोबतचा रोमँटिक फोटो

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुखने शेअर केला जेनेलिया डिसुझासोबतचा रोमँटिक फोटो

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिेनेत्री जेनेलिया डिसुझा बॉलिवू़डमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. आज त्यांच्या लग्नाला आज ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ते नेहमी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ते नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. रितेशने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुखने फोटो शेअर करून जेनेलियाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत त्यांची केमिस्ट्री पहायला मिळते आहे. या फोटोमध्ये रितेश जेनेलियाच्या खांद्यावर डोके ठेवून झोपला आहे.

हा फोटो शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे माझे आराम करण्याचे कायमचे ठिकाण आहे. मी येथे कायम राहू शकतो, हे माझे घर आहे.' या पोस्टवर जेनेलियानेही कमेंट केली आहे. तिने रितेशच्या या पोस्टवर 'आय लव्ह यू' म्हटले आहे. या फोटोसोबत कमेंटही व्हायरल होते आहे.


जेनेलियानेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया रितेशची खोड काढताना दिसते आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जनेलियाने एक प्रेमळ मेसेजही लिहिला आहे. तिने लिहिले की, 'प्रिय रितेश, तुम्ही प्रेमाला शोधत नाही, प्रेम तुम्हाला शोधत असते. याचे नशिबाशी काही देणंघेणं नसतं. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. मी तुझ्या प्रेमात पूर्णपणे वेडी आहे. प्रेमा तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


रितेश आणि जेनेलियाने एकत्र हिंदी सिनेमात डेब्यू केलं होतं. २००३ मध्ये आलेला 'तुझे मेरी कसम' सिनेमा दोघांचा पहिला सिनेमा होता. तेव्हापासून दोघानी एकमेकांना डेट करणं सुरू केल होतं. यानंतर दोघे २०१२ मध्ये लग्न बंधनात अडकले. रितेश आणि जेनेलियाला दोन मुलं रियान आणि राहिल आहेत.

Web Title: Riteish Deshmukh shares romantic photo with Genelia D'Souza on their wedding anniversary