रितेश देशमुखने अशा कॉमेडी अंदाजात केली ‘टोटल धमाल’च्या शूटिंगला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:40 IST2018-01-31T11:10:38+5:302018-01-31T16:40:38+5:30

दिग्दर्शक इंद्रकुमारच्या ‘टोटल धमाल’ या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, अभिनेता रितेश देशमुखचा फनी अंदाजही समोर आला आहे. ...

Riteish Deshmukh has done such a comedy update, shooting of 'Total Dhamal' starts! | रितेश देशमुखने अशा कॉमेडी अंदाजात केली ‘टोटल धमाल’च्या शूटिंगला सुरुवात!

रितेश देशमुखने अशा कॉमेडी अंदाजात केली ‘टोटल धमाल’च्या शूटिंगला सुरुवात!

ग्दर्शक इंद्रकुमारच्या ‘टोटल धमाल’ या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, अभिनेता रितेश देशमुखचा फनी अंदाजही समोर आला आहे. याविषयी रितेश देशमुखने म्हटले की, ‘चित्रपटात काम करताना मी आशिष चौधरीला मिस करणार.’ रितेशने मंगळवारी एक ट्विट करताना चित्रपटाच्या क्लॅपबोर्डसोबतचा एक फोटो शेअर केला. ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘पुन्हा वेडेपणा सुरू. टोटल धमाल. प्रिय मित्र आशिष चौधरीसोबत काम करताना व्यतीत केलेल्या क्षणांचे स्मरण होत आहे.’ 

तर रितेशच्या या ट्विटनंतर प्रतिक्रिया देताना आशिषने म्हटले की, एकही सह-कलाकार आणि विशेष करून एकही मित्र तुझ्यासारखा नाही. कारण ‘धमाल’मध्ये ज्या पद्धतीने आपण धमाल केली, ते कदाचित कुठेच नसेल. आशिष या अगोदर ‘धमाल’ सीरिजच्या दोन चित्रपटांमध्ये बघावयास मिळाला आहे. ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. 



या फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘धमाल’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तुफान कॉमेडी बघावयास मिळाली. या चित्रपटातही अशीच कॉमेडी बघावयास मिळेल, असेच रितेशच्या फोटोवरून दिसत आहे. 

Web Title: Riteish Deshmukh has done such a comedy update, shooting of 'Total Dhamal' starts!