सिनेमात काम करूनही बनला नाही सुपरस्टार, मात्र या ठिकाणी त्याच्या व्हिडीओला मिळतात 145 मिलियन व्हुज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:44 IST2020-03-02T12:42:13+5:302020-03-02T12:44:08+5:30

सिनेमात काम करूनही इतकी लोकप्रियता त्याला मिळाली नसेल जितकी आज त्याला टीकटॉकमुळे मिळते. टिकटॉक वरील अनेक व्हिडिओत त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते.

Riteish Deshmukh Did not become a movie star, but at this point his video gets 145 million views on Tik Tok-SRJ | सिनेमात काम करूनही बनला नाही सुपरस्टार, मात्र या ठिकाणी त्याच्या व्हिडीओला मिळतात 145 मिलियन व्हुज

सिनेमात काम करूनही बनला नाही सुपरस्टार, मात्र या ठिकाणी त्याच्या व्हिडीओला मिळतात 145 मिलियन व्हुज

हात भारी.... सगळंच लय भारी, या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आपल्या अभिनयलामुळे आज त्याने बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. इतके चांगले सिनेमातून रसिकांचे भरघोस मनोरंजन करूनही रितेशला हवे तसे यश मिळालेले नाही. सुपरस्टार हा टॅग मिळवण्यासाठी आजही रितिशचा खटाटोप हा सुरूच आहे. सुपरस्टारच्या यादीत आजही रितेश देशमुख गणला जात नाही. मात्र टीकटॉकवर त्याचे व्हिडीओ तुफान हिट ठरतात. अवघ्या तीन महिन्यातच रितेश देशमुख टीकटॉकचा सुरपस्टार बनला आहे. त्याच्या एका व्हिडीओला तर अल्पावधीत 145 मिलियन इतके व्हुज मिळाले होते. 


सिनेमात काम करूनही इतकी लोकप्रियता त्याला मिळाली नसेल जितकी आज त्याला टीकटॉकमुळे मिळते. टिकटॉक वरील अनेक व्हिडिओत त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते. जे सिनेमामुळे नाही मिळाले ते टिक टॉकमुळे मिळाल्यामुळे आज रितेशची ही आज मै उपर आसमाँ निचे अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे  सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे हेच पुन्हा सिद्ध होते.


रितेश देशमुख पाठोपाठ त्याचे मुलंही सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. त्याला दोन मुलं आहेत पण त्या दोघांनाही खूपच कमी वेळा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. रितेश आणि जेनेलियाला दोन्ही मुलांसोबत मुंबईतील एका हॉटेलच्या बाहेर नुकतेच पाहाण्यात आले. यावेळी रितेशनच्या दोन्ही मुलांचे अंदाज पाहाण्यासारखे होते. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहाताच त्यांनी दोघांनीही हात जोडत सगळ्यांना अभिवादन केले. त्यांची ही गोष्ट नेटिझन्सना प्रचंड आवडली होती.


 

Web Title: Riteish Deshmukh Did not become a movie star, but at this point his video gets 145 million views on Tik Tok-SRJ