सेल्फीच्या जमान्यात रितेशच्या मुलांनी घेतला सुनील गावस्करांचा ऑटोग्राफ, व्हिडीओने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 15:07 IST2024-07-10T15:03:31+5:302024-07-10T15:07:28+5:30

रितेशच्या देशमुखच्या मुलांनी घेतला सुनील गावस्करांचा ऑटोग्राफ. व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव (riteish deshmukh)

Riteish Deshmukh children give autograph of cricketer sunil gavaskar video viral | सेल्फीच्या जमान्यात रितेशच्या मुलांनी घेतला सुनील गावस्करांचा ऑटोग्राफ, व्हिडीओने जिंकली मनं

सेल्फीच्या जमान्यात रितेशच्या मुलांनी घेतला सुनील गावस्करांचा ऑटोग्राफ, व्हिडीओने जिंकली मनं

अभिनेता रितेश देशमुख हा बॉलिवूड गाजवणारा आणि मराठी सिनेमांशी नाळ असणारा लोकप्रिय अभिनेता. रितेशला आपण विविध सिनेमांमधून 'लय भारी' भूमिका साकारताना पाहिलंय. रितेश-जिनिलिया या जोडीने गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना 'वेड' लावलंय. रितेशची मुलं रिहान आणि राहील हे त्यांच्या नम्र स्वभावामुळे चर्चेत असतात. रितेशच्या लेकांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात त्यांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा ऑटोग्राफ घेतलेला दिसतोय. 

रितेशच्या लेकांनी घेतला सुनील गावस्कर यांचा ऑटोग्राफ

अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत पाहायला मिळतं की,  रितेश-राहील एके ठिकाणी दिसत आहेत. ही दोघंही भावंडं सुनील गावस्करांना भेटतात. सुनील हसतमुखाने त्यांच्या तिकिटांवर त्यांचा ऑटोग्राफ देतात. सुनील गावस्कर ऑटोग्राफ देताना दोघंही भावंडं आदराने आणि नम्रपणे बाजूला उभे राहतात. सुनील गावस्कर दोघांनाही ऑटोग्राफ देऊन त्यांचा निरोप घेतात. 

व्हिडीओ शेअर करुन रितेशची खास पोस्ट

हा खास व्हिडीओ शेअर करुन रितेशने कॅप्शन लिहिलंय की, "जेव्हा माझी मुलं माझ्या हिरोला भेटतात. ज्याने अनेकांना प्रेरणा दिली अशा असामान्य व्यक्तिमत्वाला ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुनील गावस्कर जी, परमेश्वर तुम्हाला असंच सुदृढ आणि दीर्घायुष्य देवो." अशा शब्दात रितेशने सुनील गावस्करांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याच्या सेल्फीच्या जमान्यात रितेशच्या लेकांनी सुनील पाजींचा घेतलेला ऑटोग्राफ व्हिडीओ पाहून अनेकांंची मनं जिंकली आहेत. रितेश देशमुख लवकरच 'पिल' या वेबसीरिजमधून भेटीला येणार आहे.

Web Title: Riteish Deshmukh children give autograph of cricketer sunil gavaskar video viral