रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:17 IST2021-10-07T14:15:32+5:302021-10-07T14:17:37+5:30

KBC: ऑनस्क्रीनवर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना विशेष आवडते.

riteish deshmukh and genelia dsouza in kaun banega crorepati 13 episode with amitabh bachchan | रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

ठळक मुद्देअलिकडेच रितेश- जेनेलियाने 'कौन बनेगा करोडपती १३' च्या (kaun banega crorepati) मंचावर हजेरी लावली होती.

बॉलिवूडमधलं सगळ्यात लोकप्रिय कपल म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D’Souza). ऑनस्क्रीनवर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना विशेष आवडते. त्यामुळेच या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ही जोडी सोशल मीडियाचा वापर करत असते. विशेष म्हणजे त्यांच्या पोस्टमधून त्यांच्यातील एकमेकांप्रती असलेलं प्रेम अनेकदा दिसून येतं. इतकंच नाही तर कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरही त्यांच्यातील प्रेम प्रेक्षकांच्या नजरेतून सुटलं नाही.

अलिकडेच रितेश- जेनेलियाने 'कौन बनेगा करोडपती १३' च्या (kaun banega crorepati) मंचावर हजेरी लावली होती. या मंचावर दोघांचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाला. विशेष म्हणजे यावेळी मंचावर बिग बी अर्थात अमिताभ बच्चन असल्याचादेखील रितेशला विसर पडला होता. परंतु, जेनेलियाच्या हे लक्षात आल्यानंतर लाजेने ती गोरीमोरी झाल्याचं पाहायला मिळालं.

सध्या सोशल मीडियावर 'केबीसी १३' चा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रितेश केबीसीच्या मंचावर जेनिलियासोबत रोमॅण्टिक सीन करत असल्याचं दिसून आलं. बिग बींच्या अमर अकबर एंथनी चित्रपटातील एक डायलॉग बोलत रितेशने जेनेलियाला प्रपोज केलं. यावेळी तो खरंच पुन्हा एकदा जेनेलियाच्या प्रेमात पडल्याचं दिसून आलं.

दरम्यान, या भागात रितेश-जेनेलिया जी रक्कम जिंकतील ती रक्कम ते  इम्पॅक्ट फाऊंडेशनला (ImPaCCt Foundation) मदत म्हणून देणार आहेत. या पैशांच्या मदतीने टाटा रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेणाऱ्या लहान मुलांची मदत केली जाणार आहे.
 

Web Title: riteish deshmukh and genelia dsouza in kaun banega crorepati 13 episode with amitabh bachchan