ऋषी कपूर यांनी सांगितला राखी बांधण्याचा नवा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 21:49 IST2016-08-18T16:19:19+5:302016-08-18T21:49:19+5:30

काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर twitterवर अमेरिकन रिअ‍ॅलिटी स्टार किम करदाशिया हिची टर उडवताना दिसले . किमची तुलना त्यांनी कांद्याच्या ...

Rishi Kapoor told the new meaning of building a rakhi! | ऋषी कपूर यांनी सांगितला राखी बांधण्याचा नवा अर्थ!

ऋषी कपूर यांनी सांगितला राखी बांधण्याचा नवा अर्थ!

ही दिवसांपूर्वी ऋषी कपूर twitterवर अमेरिकन रिअ‍ॅलिटी स्टार किम करदाशिया हिची टर उडवताना दिसले . किमची तुलना त्यांनी कांद्याच्या गोणीशी केली होती. केवळ हेच नाही तर अमेरिकन अध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटीक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या एका छायाचित्राची खिल्ली उडवतानाही ते दिसले होते. वादग्रस्त आणि रोष ओढवून घेणारे tweets करण्यात पटाईत असलेले ऋषी कपूर यांनी आज पुन्हा असेच एक tweet केले. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी  अभिनेत्री राखी यांचे  ‘कसमे वादे’ या चित्रपटातील एक छायाचित्र पोस्ट केले आहे. या छायाचित्रात राखींना दोरखंडाने बांधलेले आहे.  या छायाचित्राद्वारे ऋषी यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व काहीसे विनोदी पद्धतीने सांगितले आहे. आता काहींना ऋषी कपूर यांचा हा अंदाज रूचेल  काहींना नाही. पण म्हणून ऋषी कपूर थोडीच बदलणारे आहेत!!

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Rishi Kapoor told the new meaning of building a rakhi!