​ ऋषी कपूर यांनी शेजा-यांना दिली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2017 05:55 AM2017-03-14T05:55:55+5:302017-03-14T11:25:55+5:30

ऋषी कपूर यांच्यासारख्या बड्या स्टार्सचे शेजाºयांशी भांडण होऊ शकते? होय, होऊ शकते. ऋषी कपूर आणि डॅफोडिल को-आॅपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी ...

Rishi Kapoor threatens Sheja! | ​ ऋषी कपूर यांनी शेजा-यांना दिली धमकी!

​ ऋषी कपूर यांनी शेजा-यांना दिली धमकी!

googlenewsNext
ी कपूर यांच्यासारख्या बड्या स्टार्सचे शेजाºयांशी भांडण होऊ शकते? होय, होऊ शकते. ऋषी कपूर आणि डॅफोडिल को-आॅपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्यात पाली हिल्स येथील एका घराच्या बांधकामावरून वाद सुरु आहे. आत्ता मात्र हा वाद चिघळताना दिसतो आहे. ऋषी कपूर यांनी सोसायटीवर मानहानी दावा ठोकण्याची धमकी दिली आहे.
ऋषी कपूर यांना सोसायटीने बांधकाम रोखण्यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र याविरोधात सोसायटीतील बहुतांश निवाशांनी ऋषी यांनाच पाठींबा दिला आहे.

ऋषी कपूर यांनी आपल्या जमीनीच्या एका भागावर टॉवर उभारण्यासाठी अवैधरित्या परवानगी मिळवल्याचा दावा सोसायटीने केला आहे. ऋषी यांनी नव्या टॉवरसाठी चालवलेल्या खोदकामामुळे संपूर्ण सोसायटीचा स्ट्रक्चरला धोका निर्माण झाल्याचेही सोसायटीचे म्हणणे आहे. अर्थात असे असले तरी नरगीस मार्गावरील या सोसायटीतील बहुतांश लोक ऋषी यांच्या बाजूने आहेत. सदस्यांना सूचित न करता सोसायटीने ऋषी यांना पत्र जारी केल्याचे या सगळ्या रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सोसायटीच्या सचिवाने आणि अध्यक्षाने ऋषी यांची माफी मागावी, अशी मागणीही या रहिवाशांनी केली आहे. 

या संपूर्ण वादामुळे ऋषींचा राग अनावर झाला आहे आणि आता त्यांनी सोसायटीला कोर्टात खेचण्याची तयारी चालवली आहे. मी वकीलांशी बोललो आहे. आता मी सोसायटीविरोधात मानहानी दावा दाखल करणार आहे. सोसायटीच्या कुठल्याशा खोडसाळ व्यक्तिचा हा कारनामा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. केवळ एवढेच नाही तर मी कायम कायद्याचे पालन केले आहे. मी अतिशय कष्टाने परवानगी मिळवली आहे. डॅफोडिल्समध्ये एका नव्या बिल्डरचा रस आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. अर्थात हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Rishi Kapoor threatens Sheja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.