ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 11:45 IST2020-05-01T11:43:57+5:302020-05-01T11:45:24+5:30

लॉकडाऊनमुळे अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

rishi kapoor feneral photos alia bhatt get emotional-ram | ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर

ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर

ठळक मुद्दे ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचे निदान झाले होते.

ऋषी कपूर यांनी काल अखेरचा श्वास घेतला आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. लॉकडाऊनमुळे अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कपूर कुटुंबीयासोबत आलिया भट सुद्धा यावेळी उपस्थित होती.  यावेळी आलियाला आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते़ ती   ढसाढसा रडताना दिसली.  

वडिलांच्या जाण्याने रणबीर कपूरलाही दु:ख अनावर झाले होते.  

अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान सुद्धा उपस्थित होते.  

मुंबई पोलिसांनी ऋषी कपूर यांचे पार्थिव रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत घेऊन जावे अशी विनंती केली होती. त्यानुसार ऋषी कपूर यांचे पार्थिव घरी न नेता परस्पर स्मशानभूमीत नेण्यात आले. दरम्यान ऋषी कपूर यांच्या अंत्यसस्कारांसाठी फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. 

 ऋषी कपूर मुलगी रिद्धिमा लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकली होती. मात्र तिला परवानगी मिळाल्यावर ती प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचली.  ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचे निदान झाले होते.  त्यानंतर जवळपास 11 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार झालेत. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. 
 

Web Title: rishi kapoor feneral photos alia bhatt get emotional-ram