तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात...! नीतू कपूर यांनी मानले अंबानी कुटुंबाचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:04 IST2020-05-05T16:55:07+5:302020-05-05T17:04:10+5:30

या शब्दांत मानले आभार...

rishi kapoor death neetu kapoor thanks mukesh ambani and neeta ambani-ram | तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात...! नीतू कपूर यांनी मानले अंबानी कुटुंबाचे आभार

तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात...! नीतू कपूर यांनी मानले अंबानी कुटुंबाचे आभार

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. सुमारे दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूड कलाकारांपासून चाहत्यांपर्यंत सगळेच नीतू यांचे सांत्वन करत आहेत. अशात आता नीतू सिंह यांनी या कठीण काळात सोबत असलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. विशेषत: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना त्यांनी धन्यवाद दिले आहेत.

सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहित नीतू यांनी सर्वांना धन्यवाद दिलेत. या पोस्टसोबत त्यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला.

त्यांनी लिहिले, आमच्यासाठी मागची दोन वर्षे एक मोठा प्रवास होता. या प्रवासादरम्यान काही चांगले क्षण होते तर काही अतिशय दु:खद दिवस. भावना, वेदनांनी भरलेल्या या प्रवासात एका कुटुंबाचे आभार मानने गरजेचे आहे. हे कुटुंब म्हणजे, अंबानी कुटुंब.  या कुटुंबाच्या मदत आणि पाठिंब्याशिवाय आमचा प्रवास अशक्य होता. मागच्या 7 महिन्यात या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने  ऋषी यांना कमीत कमी वेदना होतील, याची मनापासून काळजी घेतली. हॉस्पिटलमध्ये त्यांची नीट देखभाल होत आहे की नाही हे पाहण्यापासून ते स्वत: हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांची विचारपूस करण्यापर्यंत सगळे काही या कुटुंबाने केले. आम्ही घाबरलो असताना आमचा हात हातात घेत आम्हाला धीर दिला. मुकेश भाई, नीता भाभी, आकाश, श्लोका, अनंत आणि ईशा या कठीण प्रसंगात आमच्यासाठी देवदूत बनून आलेत. आमच्या या कठिण प्रवासात तुम्ही नेहमीच आमची साथ दिली.  आम्हाला तुमच्याबद्दल जे वाटतं ते शब्दात मांडणं कठीण आहे. तुमचा पाठिंबा, प्रेम आणि काळजी या सर्वच गोष्टींसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत...

Web Title: rishi kapoor death neetu kapoor thanks mukesh ambani and neeta ambani-ram