Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:09 AM2020-02-03T10:09:22+5:302020-02-03T10:09:31+5:30

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, ऋषी कपूर यांना दिल्लीतील एका रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

rishi kapoor admitted in delhi hospital | Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर रूग्णालयात, भेटीला पोहोचले रणबीर-आलिया

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच ऋषी कपूर दीपिका पादुकोणसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, ऋषी कपूर यांना दिल्लीतील एका रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.
ऋषी कपूर गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. येथे सुमारे ११ महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. पण आता त्यांची तब्येत अचानक बिघडली.  
दरम्यान आपल्याला संक्रमण झाले असून घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे ऋषी कपूर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. कदाचित दिल्लीच्या प्रदूषणामुळे संक्रमण झाल्याचेही त्यांनी म्हटले.


ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याची बातमी मिळताच रणबीर कपूर मुंबईहून दिल्लीला पोहोचला. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेन्ड आलिया भट ही सुद्धा दिल्लीला पोहोचली. काल अरमान जैनच्या मेहंदीला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत कपूर कुटुंबिय उपस्थित होते. मात्र ऋषी आणि नीतू कपूर या सोहळ्याला उपस्थित नव्हते.  रणबीर कपूर आणि आलिया भट्टही कार्यक्रमाला हजर नव्हते. ही गोष्ट सगळ्यांनी नोटीस केली. यानंतर ऋषी कपूर यांना दिल्लीच्या रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी आली.


न्यूयॉर्कमधून उपचार घेऊन परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी ‘द बॉडी’ या चित्रपटाद्वारे कमबॅक केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. लवकरच ऋषी कपूर दीपिका पादुकोणसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.  हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दीपिका व ऋषी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  


‘द इंटर्न’हा हॉलिवूड सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. रॉबर्ट डीनिरो आणि अ‍ॅन हाथवे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या हलक्या फुलक्या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच वेड लावले होते. हा चित्रपट एका 70 वर्षांच्या पात्राभोवती फिरतो. निवृत्तीनंतर आॅनलाईन फॅशन वेबसाईटमध्ये इंटर्न म्हणून तो दाखल होतो. ही भूमिका ऋषी कपूर साकारणार आहेत. तर  दीपिका त्यांच्या बॉसच्या भूमिकेत दिसेल.  2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 

Read in English

Web Title: rishi kapoor admitted in delhi hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.