ऋषभ शेट्टीनं पाहिला 'धुरंधर २', आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीरचा अभिनय पाहून म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:22 IST2026-03-22T12:15:54+5:302026-03-22T12:22:40+5:30
'कांतारा' फेम अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली.

ऋषभ शेट्टीनं पाहिला 'धुरंधर २', आदित्य धरचं दिग्दर्शन आणि रणवीरचा अभिनय पाहून म्हणाला...
Rishab Shetty Reviews Dhurandhar 2 :दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत असतानाच, या चित्रपटाला आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचाही पाठिंबा मिळत आहे. 'कांतारा' फेम अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. चित्रपटातील 'बारीक तपशीलांचे' त्याने तोंडभरून कौतुक केले आहे.
ऋषभ शेट्टीने आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवर चित्रपटासाठी पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, "'धुरंधर: द रिव्हेंज'चा अगदी पहिलाच प्रसंग तुम्हाला स्वतःकडे खेचून घेतो आणि शेवटपर्यंत बाहेर पडू देत नाही. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही एखाद्या युद्धाच्या नगाराच्या तालाप्रमाणेच अत्यंत प्रभावी आहे". ऋषभच्या मते, हा चित्रपट केवळ एक सिक्वेल नसून एक 'जबरदस्त मांडणी' आहे. आदित्य धर हा त्याच्या चित्रपटांमधील बारकाव्यांसाठी ओळखला जातोय. आदित्य धरला उद्देशून ऋषभने लिहिले, "मित्रा, मला चित्रपटातील 'डिटेलिंग' प्रचंड आवडले".
#DhurandharTheRevenge the very first scene pulls you in and never lets go. Every frame hits like a war drum.
— Rishab Shetty (@shetty_rishab) March 21, 2026
This isn’t just a sequel; it’s a statement. Brilliant storytelling, brother absolutely loved the detailing, @AdityaDharFilms.
Top-notch performances by every single… pic.twitter.com/ugT7KkksMJ
तगड्या स्टारकास्टचा प्रभाव
रणवीर सिंगच्या मुख्य भूमिकेसोबतच ऋषभने चित्रपटातील इतर कलाकारांच्या अभिनयाचीही प्रशंसा केली. अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टने दिलेला परफॉर्मन्स अत्यंत उत्कृष्ट असल्याचे त्याने नमूद केले. यापूर्वी अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांसारख्या दाक्षिणात्य सुपरस्टार्सनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.