वाढदिवसालादेखील रिया चक्रवर्ती झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ही पद्धत आता जुनी झाली...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 14:56 IST2021-07-01T14:52:08+5:302021-07-01T14:56:40+5:30

Rhea Chakraborty trolled on her birthday : वाढदिवसाच्या निमित्तानं रियानं एक व्हिडीओ शेअर केला आणि सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं.

rhea chakraborty trolled on her birthday after appeal to help 16 cr funds for save life of kid | वाढदिवसालादेखील रिया चक्रवर्ती झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ही पद्धत आता जुनी झाली...  

वाढदिवसालादेखील रिया चक्रवर्ती झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ही पद्धत आता जुनी झाली...  

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात ती संशयीत आरोपी आहे. या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात  तिला अटक देखील झाली होती.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती  (Rhea Chakraborty) आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. पण हे काय? वाढदिवसाच्या दिवशीही रिया सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. होय, एका पोस्टमुळं रिया ट्रोल होतेय.
वाढदिवसाच्या निमित्तानं रियानं एक खास व्हिडीओ शेअर केला  आहे. याद्वारे तिने एका चिमुकल्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे. आठ महिन्यांच्या या चिमुरड्याला जन्मापासूनच मानेची व शरीराची हालचाल करता येत नाही. त्याला स्पायनल मस्क्युलर ट्रॉफी टाइप  या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. उपचारासाठी 16 कोटींचं इंजेक्शन अमेरिकेतून आणण्यासाठी खर्च येणार आहे. हे 16 कोटी रुपये जमा करण्यासाठी रियानं चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे. (Rhea Chakraborty trolled on her birthday )

पण रियानं हे आवाहन केलं आणि सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं. रिया काहीही कर, पण इमेज बदलणार नाही, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स नेटक-यांनी केल्या.

‘ तुझ्याकडे तर खूप पैसे आहेत, तू कर त्याची मदत,’ असं एका युजरने लिहिलं. काहींनी रियाच्या या प्रयत्नांना सहानुभूती लाटण्याचा प्रकार म्हटलं तर काहींनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न.  खोटा चांगुलपणा दाखवून आता काहीही उपयोग नाही. सहानुभूती मिळवण्याची ही पद्धत आता जुनी झाली आहे, अशा शब्दांत एका नेटक-यांनं तिला सुनावलं. त्या मुलाबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. पण तुझ्याबद्दल जराही सहानुभूती नाही, अशी कमेंट एकाने केली.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात ती संशयीत आरोपी आहे. या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात  तिला अटक देखील झाली होती. या पार्श्वभूमीवर सध्या रियाच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे.

Web Title: rhea chakraborty trolled on her birthday after appeal to help 16 cr funds for save life of kid