पुन्हा प्रेमात पडणार रिया चक्रवर्ती? ट्रोलिंग आणि कायदेशीर कचाट्यानंतर अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:28 IST2026-02-09T18:28:16+5:302026-02-09T18:28:42+5:30

प्रेमाच्या शोधात रिया चक्रवर्ती! सुशांतच्या मृत्यूनंतर ६ वर्षांनी सावरली अभिनेत्री; अभिनयातही करणार पुनरागमन

Rhea Chakraborty Says She Still Believes In Love Years After Sushant Singh Rajput's Death | पुन्हा प्रेमात पडणार रिया चक्रवर्ती? ट्रोलिंग आणि कायदेशीर कचाट्यानंतर अभिनेत्री म्हणाली...

पुन्हा प्रेमात पडणार रिया चक्रवर्ती? ट्रोलिंग आणि कायदेशीर कचाट्यानंतर अभिनेत्री म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादळामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे रियाच्या आयुष्यात मोठा काळ अस्थिरतेत गेला होता. जून २०२० नंतर तिला प्रचंड मानसिक तणाव आणि सार्वजनिक टीकेला सामोरं जावं लागलं. मात्र, आता सहा वर्षांच्या दीर्घ काळानंतर रियाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिने केवळ अभिनय क्षेत्रात पुनरागमनच केले नाही, तर पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं. 

'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत रियाने आपल्या संघर्षावर भाष्य केले. ती म्हणाली, "जवळपास सात वर्षे मला काम मिळाले नव्हते. मला वाटले होते की माझे अभिनेत्री होण्याचे स्वप्न आता कायमचे भंगले आहे. हे माझ्यासाठी खूप कठीण होते". 

रिया आता दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याबद्दल सांगताना ती म्हणाली, "जेव्हा हंसल सरांनी मला भूमिकेसाठी विचारले, तेव्हा मी सुरुवातीला नकार दिला होता. मी त्यांना सांगितले की मी अभिनय सोडला आहे. पण त्यांच्या आग्रहामुळे मी सेटवर परतले. सेटवर जाणं हे सायकल चालवण्यासारखं आहे, तुम्ही एकदा शिकलात की कधीच विसरत नाही".

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना रिया म्हणाली, "माझ्या आयुष्यात जे काही घडले, त्यानंतरही प्रेम ही माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट आहे. मी आजही प्रेमावर विश्वास ठेवते आणि माझ्या आयुष्यात प्रेमाला दुसरी संधी देण्यासाठी मी तयार आहे. माझ्या हृदयाचे दरवाजे प्रेमासाठी खुले आहेत".

Web Title : रिया चक्रवर्ती: कानूनी लड़ाई के बाद फिर प्यार करने को तैयार?

Web Summary : भारी जांच का सामना करने के बाद, रिया चक्रवर्ती फिर से प्यार करने के लिए तैयार हैं। लंबे अंतराल के बाद हंसल मेहता की वेब सीरीज के साथ अभिनय में वापसी करते हुए, उन्होंने कहा कि उनका दिल नई संभावनाओं के लिए खुला है और वह प्यार की शक्ति में विश्वास करती हैं।

Web Title : Rhea Chakraborty: Ready to love again after legal battles?

Web Summary : After facing immense scrutiny, Rhea Chakraborty is ready to embrace love again. Returning to acting with Hansal Mehta's web series after a long hiatus, she says her heart is open to new possibilities and believes in the power of love.